Breaking News

अस्वस्थतेतून निर्माण होणारी साहित्यनिर्मिती कालातीत व चिरंतन

 बुलडाणा(प्रतिनिधी) ।30 - प्रत्येक साहित्य निर्मिती संवेदनशीलतेतून जाणिव व सहजाणीवेची अभिव्यक्ती असते. अवती-भोवतीच्या वास्तव्यातून अस्वस्थ होणारा लेखक/कवी/विचारक परिस्थीतीचे निरीक्षण करून तिचे प्रतिबिंब आपल्या साहित्यात टिपण्याचा प्रयत्न करत असतो. अनुभव व भावनांची प्रगल्भ अनुभूती, सृजनांची सकस अभिव्यक्ती म्हणून साहित्यकृती कालातीत व चिरंतन ठरत असते. अशा साहित्यकृतीला पुरस्कृत करणे सजक व संमजस समाजाचे कर्तव्य असते. पुरस्कारामुळे लेखकाला आनंद मिळून त्याचे नव लेखन निर्माणासाठीचे मनोबल वाढत असते. पुरस्कार लेखकाला नको ते लेखण करण्यासाठी उर्जा पुरविण्याची महत्वपूर्ण कामगिरी करीत असतात, असे विचार वसंत आबाजी डहाके यांनी बुलडाणा येथे भगवान ठग तुका म्हणे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना मांडले, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुप्रसिध्द शायर संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.गणेश गायकवाड तर औरंगाबादचे कवी, पत्रकार डी.बी.जगत्पुरिया, कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर, संयोजीका वैशाली भगवान ठग-जाधव व पुरस्कार प्राप्त साहित्यीक सभास्थानी हजर होते.
कार्यक्रमाचे प्रारंभी अध्यक्ष तथा अतिथींनी अनुवादक, कवी, समिक्षक भगवान ठग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलनाने उद्घाटन कयन अतिथींचे स्वागत श्रीमती पार्वताबाई ठग-जाधव, श्रीराम जाधव यांनी केल्यानंतर संयोजिका वैशाली ठग-जाधव यांनी भगवान ठग तुका म्हणे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार तथा कार्यक्रमाद्धारे भूमिका प्रास्ताविकाद्धारे विशद केलयानंतर प्रमुख अतिथी तथा अखिल भारतीय मराठी साहित्य समेंलनाचे माजी अध्यक्ष वंसत आबाजी डहाके यांच्याहस्ते कादंबरीकार प्रतिमा इंगोले यांच्या नक्षलग्रस्त या कादंबरीला कु.मंजीरी भोयर, हिंगणघाट यांच्या दहाबाय दहा या काव्य संग्रहाला, डॉ.संजयकुमार सोनवणे, धरणगांव (खान्देश)यांच्या वैचारिक संशोधन परिवर्तन वाद आणि दलित कविता या ग्रंथाला, प्रा.किसन चव्हाण शेवगांव (अहमदनगर) यांच्या आंदकोळ या आत्मकथनास, मुंबईचे पंढरीनाथ रेडकर यांच्या रथ या कथा संग्रहाला, तर गोव्याचे प्रकाश रामचंद्र क्षिरसागर यांच्या झेलून दुःख माझे खचून गेला रस्ता या गझल संग्रहाला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप गौरवचिन्ह, प्रमाणपत्र, संत तुकारामाचे हस्ताक्षर, रोख रक्कम, शाल व पुष्पगुच्छ असे होते, पुरस्कार प्राप्त साहित्यीकांनी सतकरापित्यर्थ कृतज्ञता भाव म्हणून मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना. रविकांत तुपकर व साहित्यीक सुरेश साबळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित अतिथींपैकी कवी डी.बी. जगत्पुरीया यांनी अनुवादक तथ्ज्ञा कवी समिक्षक भगवान ठगांच्या साहित्य निर्मिती व वाडःमयीन कार्याबाबत बोलतांना सांगितले की, भगवान ठग म्हणजे कवीतेचा उजेड वाटणारा श्रीमंत माणूस, अनुवादाच्या कार्याद्धारे भगवान ठगांनी मराठी भाषा श्रीमंत केली आहे. भगवान ठग म्हणजे वाडःमयीन चैत्यनाचा खळाळता प्रवाह होते, त्यांनी नवोदितांमध्ये वाडःमयीन प्रेरणा पेरण्याची महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. असे गौरव उद्गार काढले तर कादंबरीकार रमेश इंगळे उत्रातकर यांनीही पुरस्कााच्या विषयी आणि भगवान ठगांचय वाडःमयीन कामगीरी विषयी मनोगत मांडले. आपल्या मुख्य भाषणात बोलतांना अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके पुरस्कार प्राप्त साहित्यीकांचे अभिनंदन करतांना म्हणाले की, अवती- भोवती घडणार्‍या घटनांचे अवलोकन करून वास्तव साहीत्यकृतीची जो निर्मिती साहित्यीक करीत असतो.त्या साहित्याला समाजातील विविध घटनांचे पदर उलगडत असतात. अशा साहित्यकृती रसिकांच्या मनाला भिडत असतात. साहित्यीकांच्या साहित्य कृतीला पुरस्कार मिळणे म्हणजे साहित्यीकांचा सन्मान असतो. या सन्मानाद्धारे साहित्यीकाला नव्या लेखनासाठी प्रेरणा मिळत असतात, लेखकाचे मनोबल वाढत असते म्हणूनच भगवान ठग तुका म्हणे साहित्य पुरस्काराचे मराठी साहित्य क्षेत्रामध्ये अनन्य असे स्थान आहे. या संयोजन समितीने महाराष्ट्रातल्या अनेक साहित्यीकांना लिहिते करण्यासाठी प्रेरणा दिल्या आहेत.  कार्यक्रमास अनुलक्षुण असुन संयोजन समितीचे अध्यक्ष तथा शायर डॉ. गणेश गायकवाड यांनी संक्षिप्त परंतु मर्मज्ञ असे अध्यक्षीय भाष्य केले. कार्यक्रमासाठी भगवान ठग तुका म्हणे साहित्य संयोजन पुरस्कार समितीचे पदाधिकारी,सभासद,हितचितंकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी 
जिल्हाभरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांसह साहित्यीक, कवी, पत्रकार तथा महिला, पुरूष उपस्थित होते. संचालन अरविंद शिंगाडे यांनी तर आभार प्रदर्शन सुरेश साबळे यांनी केले.