Breaking News

नेहरू युवा केंद्राद्धारे आयोजित जिल्हास्तरीय युवा सम्मेलन कार्यक्रम संपन्न

 बुलडाणा(प्रतिनिधी) ।30 - जिल्हास्तरीय युवा सम्मेलन युवाकृती व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 25 जानेवारी टिळक नाट्य मंदिर, बुलडाणा येथे करण्यात आले होते. या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा सौ.अलकाताई खंडारे, उद्घाटन म्हणून खा.प्रतापराव जाधव खेळ साहित्य वितरण वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना.रविकांत तुपकर आणि आ.हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते तर प्रमुख अतिथी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, जनशिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच शिवसेना जिल्हाध्यक्ष जालींधर बुधवत, माजी जि.प.अध्यक्ष प्रकाश पाटील, नगर सेवक संजय गायकवाड हे उपस्थित होते. या प्रसंगी वयोवृध्द कलावंत मानधन समितीचे अध्यक्ष शाहीर निवृत्ती घोंगटे, दलितमित्र शाहीर डी.आर. इंगळे, प्रा.हरिष 
साखरे, प्रा.गजानन लोहटे, सतिषचंद्र रोठे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल व्यवहारे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रीय युवा कार्यक्रमाअंतर्गत शेजार युवा संसद व विकासाकरिता युवा या माहितीपुस्तीकेचे प्रकाशन आणि जिल्ह्यातील युवामंडळ व महिला मंडळांना खेळ साहित्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.राष्ट्रीय मतदान दिन व प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला आयोजित या जिल्हा युवा सम्मेलनात युवकांना संबोधीत करतांना जि.प. अध्यक्षा सौ.अलकाताई खंडारे यांनी युवकांनी गावाच्या विकासाकरिता संघटीत रित्या प्रयत्न करावे व स्त्री-भ्रुण हत्ये बाबत जनजागृती करून बेटी बचाव बेटी पढाव करिता कार्य करण्याची गरज असल्याचे सांगितले. आपल्या उद्घाटनपर भाषणात खा.प्रतापराव जाधव 
यांनी युवकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून राष्ट्रविकासाकरिता पूढे यावे असे आवाहन केले. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष व शेतकरी युवा नेते ना.रविकांत तुपकर यांनी महिला सक्षमीकरण, शेतकरी आत्महत्या, युवकांच्या आत्महत्या, बेरोजगारी या विषयावर जिल्ह्यातून आलेल्या युवकांचा चौफेर समाचार घेत सांगितले की शेतकरी पुत्र असल्याचा अभिमान बाळगावा, न्युनगंडची भावना न ठेवता कोणतेही काम करा. निष्ठेने, सातत्याने, प्रमाणिकपणे व कष्टामुळे त्यामुळे नैपूण्य मिळवून आपले भविष्य उज्वल करता येईल. आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले की भ्ज्ञारतीय राज्य घटनेने दिलेल्या मतदानाच्या अधिाकरामुळे या देशाचे नेतृत्व करण्याचा संधी सामान्य नागरिकांना मिळाली आहे. राष्ट्र घडविणारे, देशाचे नेतृत्व करण्याचे सामर्थ असलेले युवक निर्माण व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे व नगर सेवक संजय गायकवाड यांनी समायोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुयवातीला युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा युवा समन्वयक डॉ.दत्ता देशमुख यांनी केले.संचलन पत्रकार रणजितसिंह राजपूत यांनी केले तर आभार प्रदर्शन अजयसिंग राजपूत यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी धनंजय चाफेकर, समाधान बोरसे, निलेश शिंदे, अमर बोरसे, विक्रांत मगर, अनंता बनाईत, शुभांगी वाकोडे, मनिषा लहासे, अभिजीत शिंगणे, ज्ञानेश्‍वर बोरसे, श्रीकांत मांजरे, प्रमोद टेकाडे, पुनम वाकोडे, हेमंत लताळे यांनी परिश्रम घेतले.