Breaking News

करंजी सेवा संस्थेच्या चेअरमपदी विजय अकोलकर


 अहमदनगर । प्रतिनिधी । 11 - पाथर्डी तालुक्यात नावाजलेली व अग्रगण्य असलेली तसेच राज्य शासनाकडून उत्कृष्ट सहकारी संस्था म्हणुन सहकारमंत्री यांचे हस्ते गौरववण्यात आली असलेल्या करंजी सेवा सोसायटीची चेअरमन व व्हा चेअरमन पदाची निवडणुक पार पडली. राजळे कुटुंबातील विश्‍वासू म्हणुन परीचीत असलेले विजय तुळजाराम अकोलकर यांची चेअरमनपदी तर व्हा चेअरमनपदी शारदा अकोलकर यांची निवड करण्यात आली. यावेळी पंचायत समीतीचे माजी सभापती बाळासाहेब अकोलकर, शरद अकोलकर उपस्थीत होते.
 करंजी सेवा सोसायटी ही पाथर्डी तालुक्यामध्ये आर्थीकच नव्हे तर राजकीय क्षेत्रामध्ये नावलौकीक असलेली सोसायटी आहे. या सोसायटीवर गेल्या विस वर्षापासून माजी सभापती बाळासाहेब अकोलकर यांची सत्ता आहे.धान्य पुरवठा, रॉकेल, शेतकर्‍यांसाठी पशु आहार यांसह दुष्काळात चालवलेल्या जाणार्‍या चारा छावण्यांसह अनेक व्यवहार या सोसायटीमार्फत अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने चालवले गेले आहेत त्यामुळे संस्था चांगल्या प्रकारे चालवली जात असल्याने या निवडणुकीत माजी सभापती बाळासाहेब बाळासाहेब अकोलकर, विजय अकोलकर व शरदराव अकोलकर यांचे गटाकडेच रहावी अशी सर्व सामान्य सभासदांसह ग्रामस्थांची अपेक्षा होती.आणी झालेही तसेच निवडणुक बिनविरोध पार पडली त्यामुळे सत्ताधार्‍यांनी विरोधकांसह सर्वांचे आभार मानले परंतु चेअरमनपदी कोणाची निवड होणार यासाठी मात्र अनेकांचे लक्ष लागून होते.विजय अकोलकर यांचेकडे चेअरमनपदाची सुत्रे जावीत तरच संस्थेला उज्वल्ल भविष्य मिळू शकेल असे अनेकांना वाटत होते आणी झालेही तसेच
चेअरमन पदावर निवड झाल्यानंतर बोलताना विजय अकोलकर म्हणाले येत्या पाच वर्षात संस्थेचा नावलौकीक वाढेल असे आणी सभासदांचे हित पाहून सर्वांना बरोबर आणी विश्‍वासात घेवून काम करणार आहे. संस्थेमध्ये विविध उपक्रम राबवून संस्थेला आर्थीक फायदा कसा होइल याकडे प्रामुख्यांने लक्ष दिले जाणार आहे.धान्य आणी रॉकेल वितरणाबरोबरच गॅस, पशुखाद्य, खते, बि-बियाणे विक्रीसह कांदा गोणी अशी शेतकर्‍यांना आणी सभासदांना लागणारा माल किंवा साहीत्य सेवा संस्थेमार्फत विक्रीसाठी ठेवली जाणार आहेत. संस्था संगणकीकृत झाली असली तरी सर्व दप्तर,रजिष्टर तसेच रेशनकार्ड असो वा पिककर्ज सर्व बाबी ऑनलाइन केले जाणार आहे.संस्थेच्या इमारतीच्या वरचा भाग बांधकाम करून त्यामधुन उत्पांन्नाचा स्रोत उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे अकोलकर यांनी सांगीतले.नामदेव मुखेकर,मोहन गंगाजी अकोलकर,लक्ष्मण मुखेकर,गणपत ढमाळ उपस्थीत होते.संस्थेचे मावळते चेअरमन सुनिल अकोलकर यांनी नवनिर्वाचीत पदाधिकार्‍याचे अभिनंदन केले.