Breaking News

शेवगाव नगरपालिका निवडणुकीत 83.35 टक्के मतदान


 अहमदनगर । प्रतिनिधी । 11 - शेवगांव व जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी मोठ्या उत्साहात मतदान झाले. जामखेडची निवडणूक ना. प्रा.राम शिंदे यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची असली तरी आज मतदारांनी मतदान करुन निवणुकीत आपला कौल कोणाला दिला, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. रविवारी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. दिवसभरात 83.35 टक्के असे विक्रमी मतदान झाले. 
शेवगावात नगरपालिकेच्या 21 जागांसाठी आज मतदान झाले.  तर जामखेड येथे 29 मतदान केंद्रावर आज मतदान करण्यात आले. शेवगांवसाठी 30 मतदार केद्रांची उभारणी करण्यात आली होती. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष असल्याने पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. तुरकळ वाद सोडता मतदान उत्साहात व शांततेच्या वातावरणात पार पडले.
गैरप्रकार होवू नये, यासाठी पोलिस प्रशासाने शुक्रवारी प्रमुख भागातून संचलन केले होते. तसेच मतदान होेईपर्यंत सर्व परवानाधारक देशी - विदेशी दारु विके्रते, बिअर शॉपी आणि परमिटरुम बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने निवडणुकीतील गैरप्रकार टाळण्यास मदत झाली. 
ना.शिंदे व राष्ट्रवादीचे पक्षनिरीक्षक सुरेश धस यांनी या निवडणुकीत मोठी उत्सुकता निर्माण केली होती. मतदारांनी कोणाला कौल दिला हे आता निकालानंतरच स्पष्ट होईल.