Breaking News

सनीसोबत काम करायला आवडेल : आमीर


मुंबई, 20 - सनी लिऑनने सीएनएन आयबीएनच्या भुपेंद्र चौबे यांना दिलेल्या मुलाखतीवरुन सध्या वाद सुरु आहे. यानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी सनीला पाठिंबा देत मुलाखतकार भुपेंद्र चौबेवर सडकून टीका केली. सनीला पाठिंबा देणार्‍यांमध्ये आता परफेक्शनिस्ट आमीर खानचाही समावेश झाला आहे.
आमीरने ट्विटरच्या माध्यमातून सनी लिऑनला पाठिंबा दिला आहे. आमीरने लिहिले आहे की, सनीने मुलाखतीदरम्यान दाखवलेला धीर आणि सामंजसपण कौतुकास्पद होता. मात्र मुलाखतकाराबद्दल मी तसे बोलणार नाही. सनी मला तुझ्यासोबत काम करायला नक्कीच आवडेल. तुझ्या भूतकाळामुळे मला काहीही फरक पडत नाही, जसे मुलाखतकार म्हणाला.