साईबाबांचे विचार दासगणू महाराजांनी सर्वत्र पोहचवले
अहमदनगर । प्रतिनिधी । 23 - धार्मिक स्थळे ही शक्तिपीठे आहेत. या माध्यमातूनच समाज एकत्र येतो.संतकवी दासगणू महाराजांनी प्रवचने, कीर्तनातून सामाजिक सुधारणा केली. साईबाबांचे विचार दासगणू महाराजांनी सर्वत्र पोहोचवले, असे प्रतिपादन धर्मादाय उपायुक्त हिरा शेळके यांनी केले.
संतकवी दासगणू महाराजांच्या 148 व्या जन्मोत्सवानिमित्त अकोळनेर येथे दासगणू महाराज जन्मस्थ स्थळा वर मोठ्या उत्साहात संपन्न झाला राष्ट्रहित संवर्धन मंडळ, संत दासगणू महाराज जन्म स्थळ विकास समिती व ग्रामस्थाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पहाटे मुबई येथील सी ए विद्याधर व स्मिता खांडेकर यांच्याहस्ते पादुका अभिषेक व पूजा करण्यात आली नंतर श्रीसाई सच्चरित पारायण संगीतमय साई कथामृत विकास महाराज गायकवाड यांनी केले .पारस महाराज मुथ्था सुहास महराज जोशी यांचे दासगणूंच्या जीवनावर प्रवचन झाले. यावेळी धर्मादाय उपायुक्त शेळके, शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अप्पासाहेब शिंदे, रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र संघचालक नानासाहेब जाधव, शिर्डी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी दिलीप ओगले, जनसंपर्क अधिकारी मोहन
यादव, साई मंदिराचे मुख्य पुजारी दिलीप शास्त्री सुलाखे, अकोळनेरच्या सरपंच सविता मेहेत्रे, उपसरपंच मच्छिंद्र यादव, राष्ट्रहित संवर्धन मंडळाचे अध्यक्ष अरुण धर्माधिकारी, कार्याध्यक्ष सतीश झिकरे, जन्मस्थळ विकास समितीचे अध्यक्ष पुष्कराज पाटील, सतीश गायकवाड, सहकार्याध्यक्ष रावसाहेब गारूडकर, कोषाध्यक्ष श्रीकांत खाजगीवाले, डॉ. सतीश राजहंस, पारस महाराज मुथ्था, शशिकला बागडे, नागोरिया, जखोटिया, चंद्रकांत गट्टाणी, बाळासाहेब शेळके, भगवान मेहेत्रे, बाळासाहेब मेहेत्रे आदी उपस्थित होते. शिंदे यावेळी बोलताना म्हणाले, दासगणू जन्मस्थळ विकासासाठी शिर्डी संस्थानने प्रस्ताव मंजूर केला असून न्यायालयाच्या आदेशानंतर 25 लाखांचा विकास निधी हस्तांतरित करण्यात येणार आहे. तसेच बाबाच्या समाधी महोत्सवात दासगणू महाराजावर प्रवचन ठेवणार आहोत. प्रास्ताविकात झिकरे म्हणाले , दासगणू जन्मस्थळाचा विकास आराखडा तयार असून कोटी 25 लाखांचा निधी यासाठी लागणार आहे.
दानशूर व्यक्ती शासनाकडून प्राप्त झालेल्या काही निधीतून टप्प्याटप्प्याने काही विकासकामे पूर्ण झाली आहेत. सूत्रसंचालन राधेश्याम कुलकर्णी यांनी केले, तर आभार सतीश गायकवाड यांनी मानले.