विकासकामे करताना कुठलाही भेदभाव केला नाही - आ. जगताप
अहमदनगर । प्रतिनिधी । 23 - आमदार अरुण जगताप व आपल्या निधीतून शहरात विविध विकासकामे केली आहेत. ही विकासकामे करताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव केलेला नाही. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विविध प्रभागातील विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांना विकासकामांसाठी आमदार निधी उपलब्ध करून दिला आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून चैतन्य कॉलनी येथे रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक विपूल शेटिया, स्थायीचे माजी सभापती मनेष साठे, प्रशांत मुथा, निरज गांधी, हिम्मतलाल शिंगी, संपतलाल कटारिया, उमेश कोरे, शैलेश देवी, संजय हिंगणे, रजनीश जोशी, महावीर शेटिया, महावीर कटारिया, शांताबाई गांधी, मंगला गांधी, वसुंधरा बोदरे, भारती शिंगी, उज्ज्वला कटारिया, रत्नमाला मुथा आदी उपस्थित होते.नगरसेवक विपूल शेटिया म्हणाले की, चैतन्य कॉलनीतील रस्त्याचे काम नागरिकांच्या मागणीनुसार सुरू करण्यात आले आहे. रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी आपण आमदार संग्राम जगताप यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. मनेष साठे व आपण प्रभागातील नागरिकांशी वेळोवेळी संवाद ठेवतो. नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होतो. आमच्या दोघांचे पक्ष वेगळे असले, तरी नागरिकांसाठी आम्ही दोघेही पक्षीय राजकारण बाजूला ठेवून प्रभागातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्नशील असतो, असे ते म्हणाले.