अंत्योदय योजनेचा अन्नधान्याचा फेबुवारी महिन्याचा तालूका निहाय पुरवठा जाहीर
जालना, 10 - जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून अंत्योदय (नियमित) योजनेतील फेबुवारी 2016 चा अन्नधान्याचा पुरवठा पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी जिल्हयातील तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय गोदामात केला आहे. तालुक्यातील शासकीय गोदामावर पुरवठा करण्यात आलेला अंत्योदय योजनेचा गहू, तांदूळाचा तपशील तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे.
जालना शासकीय गोदामावरील 9027 शिधापत्रिकाधारकांसाठी 1895 क्कि्ंटल गहू, 1262 क्कि्ंटल तांदूळ, बदनापूर या शासकीय गोदामावरील 3758 शिधापत्रिकाधारकांस 789 क्कि्ंटल गहू, 525 क्कि्ंटल तांदूळ,भोकरदन शासकीय गोदामावरील 7279 शिधापत्रिकाधारक 1528 क्विंटल गहू,1018 क्कि्ंटल तांदूळ, जाफ्राबाद- शासकीय गोदामावरील 3981 शिधापत्रिकाधारकास 835 क्कि्ंटल गहू,557 क्कि्ंटल तांदूळ, परतूर- शासकीय गोदामावरील 3876 शिधापत्रिकाधारकास 813 क्कि्ंटल गहू,542 क्कि्ंटल तांदूळ, मंठा शासकीय गोदामावरील 4075 शिधापत्रिकाधारकास 855 क्कि्ंटल गहू, 570 क्कि्ंटल तांदूळ, अंबड शासकीय गोदामावरील 5839 शिधापत्रिकाधारकास 1225 क्कि्ंटल गहू,817 क्कि्ंटल तांदूळ आणि घनसावंगी शासकीय गोदामावरील 5144 शिधापत्रिकाधारकास 1080 क्कि्ंटल गहू ,719 क्कि्ंटल तांदूळ.