जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची आढावा बैठक
अहमदनगर । प्रतिनिधी । 05 - अहमदनगर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची आढावा बैठक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद दाणेज यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात घेतली.
या बैठकीत रेशन कार्ड पुरावा इतर कामांसाठी सक्तीचा करु नये, ग्रामीण लोड शेडींगमुळे ज्या ग्रामीण भागातील नागरिकांना बराच वेळ आंधारात रहावे लागते अशा कार्डधारक नागरिकांना रॉकेलचा पुरवठा करण्यात यावा, शहरात सर्रासपणे गुटका व मावा पान टपरीवर विक्री होतो. त्यावर निबंर्ध आणण्यासाठी संबंधित कार्यालयाने कार्यवाही करावी, नवीन गॅस कनेक्शन घेतांना डिलरने इतर वस्तू घेण्याबाबत ग्राहकांना सक्ती करु नये, चांदणी चौकात सिंग्नल ब-याचदा बंद असतो तो नियमित करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, मार्केटमध्ये विक्री होणारे चीफ्स, कुरकुरे यांची किंमत शहराबाहेरील धाब्यांवर जास्त लावून ग्राहकांची लूट केली जाते यासंबंधी योग्य ती कार्यवाही संबंधित कार्यालयाकडुन व्हावी आदी अनेक विषयांवर सदस्यांनी उहाफोह केला. यावर संबंधित विभागांनी योग्य ती कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पुढील बैठकीत सादर करावा अशी सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद दाणेज यांनी केली. या बैठकीत सदस्य सर्वश्री अंबादास कारभारी कळमकर, संतोष शिवाजीराव भुसारी, विलास कोंडीबा जगदाळे, शिरीष प्रभाकर बापट, प्रकाश सिताराम रासकर, कारभारी एकनाथ गरड, प्रा. कुलकर्णी मनोज शामराव, बबनराव मुरलीधर भुसारी पाटील, कुंडलीक दादाबा मिसाळ, सुनिल उत्तम देशमुख, श्रीमती छाया अरविंद कुरुमकर, शेख जुलेखा फैरोज, सौ. शुभांगी प्रमोद पावसे, सौ. सुचेता दिलीप कुलकर्णी, श्रीमती मिता कोहली तसेच महावितरण विभागाचे व्ही.व्ही. सानप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे डी. एल. खेडकर, आरोग्य विभागाचे पी. एस. नलावडे, जिल्हा क्रिडा अधिकारी अनिल चोरमले, सहायक नियंत्रक आर.डी. दराडे, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, सहायक पुरवठा अधिकारी एस. एल. सुसरे, पुरवठा निरीक्षण अधिकारी नितीन गर्जे आदी उपस्थित होते.