दोन गटातील वादावरुन दगडफेक
अहमदनगर । प्रतिनिधी । 25 - तेलिखुुंड येथील वडापावच्या गाडीवर वडा खाताना धक्का लागल्याच्या कारणावरुन लहान मुलांचे भांडण झाले. या भांडणातुन दोन गटात दगडफेकीचे घटना घडली. या घटनेमुळे शहरात अफवांना उधान आले. सर्वच बाजारपेठा काही काळ बंद झाल्या. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे त्वरीत शांतता निर्माण झाली. याचा बाजारपेठेवर कोणताही परिणाम झाला नाही.
या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात चार ते पाच जणांविरुध्द दंगलीच गुन्हा दाखल करण्यात आला. दुकानसमोरील फुटेलवरुन घटनेतील तरुणांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.