दुष्काळातून शेतकरी सावरू दे ः महापौरांचे खंडोबाला साकडे
अहमदनगर । प्रतिनिधी । 25 - राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असेलेल्या नगर जिल्हातील पारनेर तालुक्यातील पिंपळगावरोठा येथील श्री कोरठण खंडोबा मंदिराच्या वार्षिक यात्रा उत्सव आज मोठ्या उत्साहात सुरु झाला महापौर अभिषेक कळमकर आणि प्राची कळमकर या नाव दापत्याच्या हस्ते सकाळी 6 वा आरती , महाभिषेक व पूजा होऊन यात्रेला प्रारंभ झाला
यावेळी तहसिलदार भारती सागरे, देवस्थानाचे अध्यक्ष पाडुरंग गायकवाड रामदास मुळे , सुरेश सुपेकर, लक्ष्मण सुबरे , शाताराम खोसे, बबन झावरे , डॉ मोहन घुले ,महादेव ढोमे , जालिंदर खोसे , बाबाजी जगताप , चंद्रकांत कुलकर्णी , गीता कुलकर्णी सह शेकडो भक्त उपस्थित होते तत्पूर्वी पहाटे 4 वा देवाला मंगल स्नान घालून चांदीचे सिहासन व उत्सव मूर्तीचे अनावरण करण्यात आले
यावेळी बोलताना कळमकर म्हणाले कोरठण खंडोबाचे हे जागृत व जेजुरी नंतर मान असेलेले देवस्थान आहे. राज्यभरातील लाखो भाविकांचे कुलदैवत आहे. दुष्काळातून शेतकरी सावरू दे हे देवाला मी साकडे घातले आहे सर्वसामन्यांचा देवाने दुष्काळातून मार्ग निघावा व गोरगरीब व शेतकर्याचे भले व्हावे अशी प्रार्थना केली आहे असे ते म्हणाले यात्रेचे नियोजनसाठी पारनेर व नगर पोलिस, होमगार्ड क्रांती शुगर कारखान्याचे सुरक्षा पथक , आळकुटी कॉलेजेचे स्वयंसेवक , वाहतूक पोलिस, आरोग्य पथक असून एस टी बसने विविध ठिकाणाहून 40 जादा गाड्या सोडल्या आहेत यात्रा महोत्सव दि 26 जाने पर्यंत चालणार असून आज दुसर्या दिवशी पालखी सोहळा, छबिना मिरवणूक आदी कार्यक्रम तर उद्या खंडोबा चांदीची पालखी मिरवणूक काढण्यात यईल यावेळी मिरवणुकीमध्ये पालखीचे मानकरी सहभागी होते.आलेल्या पालख्यांमुळे सर्व रस्ते भाविकांनी गजबजतात नंतर .बेल्हा व ब्राम्हण वाडा येथील काठ्यांची मिरवणूकरस्त्यांपासून सुरुवात होऊन दोन्ही काठ्यांपायरीजवळ आल्यावर शासकीय महापूजा होऊन एका काठी देवाला तर दुसरी पायरीजवळून कळसावर टेकवली जाऊन त्या देवदर्शन घेतात नंतर इतर काठ्यांची मिरवणुका सुरु होतात आजपासून यात्रोत्सव सुरु होत असला तरी कालच सुमारे 40 हजारावर भाविकांनी देवदर्शन घेतले.