Breaking News

परिचर भरती प्रकरणी अधिकार्यांसमवेत पदाधिकार्यांचाही सहभाग? सावळा गोंधळ होऊनही एकाही सदस्याने उठवला नाही आवाज

परभणी/प्रतिनिधी । 01 -जिल्हा परिषद अंतर्गत घेण्यात आलेल्या परिचर भरतीमध्ये अनेक वेळा गोंधळ निर्माण होवुन परिक्षा एक तर रद्द करावी लागली व नंतर उत्तर पत्रिकेतही अनेक चुका करुन परिस्थीती जैसे थे असल्याची जि.प. च्या अधिकार्‍यांनी जाणीवच करुन दिली.
                     
  याबाबत अधिक वृत्त असे की, जि.प. मार्फत घेण्यात आलेल्या परिचर पदासाठीच्या परिक्षा प्रथम दि. 29 नोव्हें. 2015 रोजी घेण्यात आली होती. या परिक्षेला राज्यभरातुन सुमारे 12 ते 15 हजार विद्यार्थी परिक्षेसाठी आले होते. राज्याच्या विविध ठिकाणाहुन त्यामध्ये चंद्रपुर, नागपुर, यवतमाळ, नाशिक, नांदेड, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातुर, बिड, हिंगोली येथुन परभणी येथे हजर होते. परिक्षेला सुरूवात होताच प्रश्‍न पत्रिकेला सिल नसल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले व गोंधळाची परिस्थीती निर्माण झाली हीच स्थिती सर्व केंद्रावर झाली. याला जवाबदार असणार्‍या जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांची प्रमुख भुमिका असुन त्यांनी या प्रकरणामध्ये थोडीही काळजी न घेतल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागल्याची परिस्थीती निर्माण झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 10-12 हजार विद्यार्थ्यांनी रस्ता रोको करुन जिल्हाधिकांर्‍यांना जाब विचारला परंतु जि.प.चा एकही सदस्य आपली भुमिका मांडण्यास समोर आला नाही.