Breaking News

अशोक सोनवणे यांना बहुजनरत्न पुरस्कार; आज वितरण


 नाशिक/प्रतिनिधी । 03 - दै. लोकमंथनचे मुख्य संपादक आणि बहुजन चळवळीतील अग्रणी अशोक सोनवणे यांना गाडगे महाराज विद्रोही विचार मंचचा बहुजनरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. गाडगे महाराज विद्रोही विचार मंचतर्फे रविवार दि. 3 जानेवारी 2016 रोजी जिजाऊ, सावित्री, रमाई महामाता संयुक्त जयंतीचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात अशोक सोनवणे यांच्यासह अन्य पुरस्कारार्थींना गौरविण्यात येणार आहे.
संत गाडगे महाराज धर्मशाळा नाशिक येथे आयोजित संयुक्त जयंती महोत्सवात सायंकाळी 6 वा. विचारांचा मुडदा पडला या पुस्तकाचे लेखक प्रा. यशवंत गोसावी यांचे व्याख्यान होणार आहे यावेळी अशोक सोनवणे यांच्यासह कै. डॉ. वसंत पवार (समाजरत्न) शिवकार्य गडकोट मोहीम (समाजरत्न), कॉ. राजू देसले (मी विज्ञानवादी) श्री.कृष्णा चांदगुडे (मी विज्ञानवादी), कु. गोदावरी देवकाटे (मी विज्ञानवादी), शशीभाई उन्हवणे (बहुजनरत्न) शिवश्री विक्की गायधनी (शिवक्रांतीवीर), आधारतिर्थ आश्रम त्र्यंबकेश्‍वर (सेवाभावी) व सौ. सुनीता शिंदे (सेवाभावी पुरस्कार) यांनाही पुरस्काराने विभुषित करण्यात येणार आहे. या संयुक्त जयंती महोत्सवाला निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर निवृत्त जिल्हा सत्र न्यायाधिश अ‍ॅड. बी.डब्ल्यू पवार, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे उपाध्यक्ष केतनभाई सौमैय्या, मविप्रच्या सरचिटणीस निलिमाताई पवार, पोलीस उपायुक्त अरविंद गायकवाड, महिला बालकल्याण सभापती वत्सलाताई खैरे, पो.निरीक्षक मधुकर कड, सायं.दैनिक काळीमातीचे संपादक राहुल जैन बागमार, नगरसेवक शाहू खैरे, विनायक खैरे, श्रमीक सेनेचे सुनील बागुल, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ता हंसराज वडघुले, अत्याचार विरोधी कृती समितीचे अध्यक्ष राहुल तुपलोंढे, संभाजी ब्रिगेडचे महानगरप्रमुख नितीन रोटे पाटील, स्वाभीमानी संभाजी ब्रिगेडचे अहमदनगर जिल्हाप्रमुख सोमनाथ कराळे, नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉ. हर्षल गुंजाळ, प्रफुल्ल पाटील आदि मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. सदर कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संत गाडगे महाराज विद्रोही विचार मंचचे समन्वयक प्रफुल्ल वाघ, युवराज पवार यांनी केले आहे.