Breaking News

गणेशोत्सव स्पर्धेसाठी दोन लाखाची बक्षिसे

अहमदनगर, दि. 24, ऑगस्ट - गणेशोत्सव  स्पर्धेसाठी 1 लाख 80 हजार रुपयाची बक्षिसे योजना महापालिकेने घोषित केले असून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी  बक्षिसाची रक्कम दुपटीने वाढविली आहे असे महापौर स सुरेखाताई कदम यांनी सांगितले . महापालिका गणेशोत्सव देखावे स्पर्धा परीक्षण समितीची नुकतीच  बैठक  झाली त्यात हा निर्णय झाला आहे . असे कदम यांनी सांगितले . स्थायी समिती सभापती सुवर्णा जाधव , सभागृह नेते  गणेश कवडे , नगरसेवक अनिल बोरुडे ,  दत्तात्रय मुद्गल , सहाय्यक आयुक्त विक्रम दराडे , डॉक्टर अमोल बागुल , आदी उपस्थित  होते .
स्पर्धेसाठी तीन प्रकार ठरविण्यात आले आहे त्यात पहिल्या प्रकारात समाजप्रबोधनपर  देखाव्यासाठी 21 हजार , 11 हजार ,व 7 हजार , अशी तीन बक्षिसे देण्यात  यातील . त्यात स्वच्छता  अभियान ,स्त्री भ्रूणहत्या , पर्यावरण संतुलन , पाणी बचत आदी देखाव्यांना प्राधान्य असेल . दुसर्‍या प्रकारात ऐतिहासिक ,धार्मिक व  अध्यात्मिक देखाव्यांनाही वरील रकमेची प्रथम तीन  बक्षिसे देण्यात येतील तिसर्‍या प्रकारात सोशल मीडिया व आधुनिक  तंत्रज्ञानावर  आधारित देखाव्यांना वरील  रकमेची प्रथम तीन बक्षिसे दिली जाणार आहेत . त्याशिवाय व्यक्तिगत प्रथम
5 हजार व दुतीय तीन हजाराचे बक्षीस दिले जाणार आहे . यात मूर्तिकार ,निवेदक , प्रकाश योजना , संगीत व नेपथ्य यासाठी नंबर निवडण्यात एणार आहेत .  तसेच याशिवाय मराठमोळ्या संस्कृतीची जपवणूक करणार्‍या गणेश विसर्जन मिरवणूक काढणार्‍या मंडळाला 11 हजार ,7 हजार , व 5 हजार  अशी तीन प्रथम  बक्षिसे देण्याचा निर्णय बैकथित झाला आहे असे कदम यांनी सांगितले.