विजय चौधरी डबल ’महाराष्ट्र केसरी’
नागपूर, 10 - अत्यंत चुरशीच्या झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीमध्ये जळगावच्या विजय चौधरीने बाजी मारली आहे. मुंबईच्या विक्रांत जाधववर मात करत महाराष्ट्र केसरीची गदा यंदाही स्वतःकडे राखण्यात
विजयला यश आलं आहे.
डबल ‘महाराष्ट्र केसरी’ ठरलेला म्हणजेच सलग दोनवेळा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवणारा विजय हा
सहावाच पैलवान आहे. विजय चौधरीने विक्रांतचा 6-3 ने पराभव केला. दरम्यान महाराष्ट्र केसरीची थेट पोलिस दलात नियुक्ती करण्याची घोषणा अंतिम लढतीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. स्पर्धेवेळी लाल
मातीतून कुस्तीचा थरार अनुभवण्यासाठी मुख्यमंत्रीही नागपुरात उपस्थित राहिले होेते.
