Breaking News

आमिर खानला रस्ते सुरक्षा अभियानातूनही हटवले


लखनऊ, 10 -:  एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी 
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आमिर खानला रस्ते सुरक्षा अभियाचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडेर म्हणून निवडले होते. आमिरच्या सत्यमेव जयते या शोमध्ये रस्ते अपघातांविषयीबाबतचा एपिसोड दाखवण्यात आल्यानंतर गडकरी यांनी अ‍ॅम्बेसिडेर होण्याबाबत आमिरशी चर्चा केली होती. मात्र आता या अभियानातूनही त्याला हटवण्यात आले. 
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एका अ‍ॅवॉर्ड शोदरम्यान देशातील वाढत्या असहिष्णुततेबाबत विधान केले होते. आपली पत्नी किरण रावने देश सोडून जाण्याबद्दल आपल्याला सुचविले होते असे त्याने विधान केल होते. त्याच्या या विधानानंतर देशभरातून आमिरवर टीका करण्यात आली. त्यानंतर त्याला अतुल्य भारतच्या जाहिरातीतूनही
हटवण्यात आले.