Breaking News

प्राणी मित्राने दिले घारीला जीवनदान


 पुणे (प्रतिनिधी) । 10 -  पुणे स्टेशन येथील सौरभ हॉलच्या गॅलरीच्या ग्रीलमध्ये अडकलेल्या घारीला एका प्राणी मित्रामुळे जीवनदान मिळाले.  
विक्रम नंदकुमार भोसले असे घारीला जीवनदान दिलेल्या प्राणीमित्राचे नाव आहे. बुधवारी (दि. 6) सायंकाळी पुणे स्टेशन येथील सौरभ हॉलच्या गॅलरीच्या ग्रीलमध्ये एक घार अडकली. नागरिकांनी तत्काळ प्राणी मित्र विक्रम यांच्याशी संपर्क साधला. 
त्यानंतर विक्रम तातडीने तिथे गेले. गॅलरीचा पाईप तुटला होता. त्यात अडकून घार रक्तबंबाळ झाली होती. विक्रम यांनी अथक प्रयत्न करुन घारीला पाईपच्या बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या घारीवर विक्रम यांनी उपचार केले. तिला दररोज हाताने अन्न भरले. विक्रम यांच्या या मायेमुळे घार ठणठणीत बरी झाली. ती आज उडून निसर्गाच्या सान्निध्यात विहारण्यासाठी गेली. 
विक्रम हे वाईड लाईड फिल्म असोशिएशन संस्थेत प्राणीमित्र म्हणून काम करतात. विक्रम यांनी  आजवर अनेक विषारी, बिनविषारी प्राणी, पक्ष्यांना जीवदान दिले आहे. विक्रम म्हणतात ’’प्राणी वाचवा’’, “निसर्ग वाचवा’’, जीवन वाचवा’’. 
पक्षी कोठे अडकले असतील तर नागरिकांनी प्राणीमित्र विक्रम भोसले 9689843326 यांच्याशी या  मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.