Breaking News

दुष्काळग्रस्तांसाठी एसटी कर्मचार्‍यांकडून एक दिवसाचा पगार! - रावते

मुंबई, 22 - राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी एसटीतील कर्मचार्‍यांनी आज आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलं. तब्बल 6,26,31,489 रुपयांचा निधी देण्यात आला आहे. अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर
रावते यांनी केली.
काही महिन्यांपूर्वीच राज्यातील 14 हजार 708 गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. या सर्व गावांची पैसेवारी 50 पेक्षा कमी आहे. त्यामुळे इथे दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर केंद्राकडूनही दुष्काळ निधी जाहीर करण्यात आला.राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी 3050 कोटी रुपयांचं पॅकेज मंजूर केलं होतं. राज्यात कमी झालेल्या पावसामुळं बळीराजा चांगलाच चिंतेत आहे. त्यामुळे यंदाही दुष्काळाला तोंड द्यावं लागत आहे.