नव्या सीवुड्स स्थानकासाठी विशेष ब्लॉक
मुंबई, 7 - यापूर्वी नवी मुंबईतील सीवुड्स दारावे हे स्थानक वगळता बहुतांश स्थानके आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत. त्यामुळे या स्थानकाचे एल अँड टी आणि सिडकोच्या माध्यमातून पुनर्विकास करून स्थानकाची इमारत नव्याने उभारण्यात आली आहे. या नव्या इमारतीचे बहुतांश काम पूर्ण झाल्याने ही इमारत सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
त्याकरता सध्या लोकलची वाहतूक सुरू असलेले रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर यांसह काही तांत्रिक वस्तूंचे स्थलांतर करावे लागणार आहे. याकरता हार्बर मार्गावर विशेष ब्लॉक येत्या महिनाभरात घेण्यात येणार आहे. या कामाला साधारणपणे एक ते दोन दिवसांचा कालावधी लागू शकतो, असेही ओझा यांनी सांगितले. या काळात पनवेलकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक नेरूळ आणि वाशी स्थानकातून चालवली जाईल. त्यामुळे हार्बर मार्गासह ट्रान्सहार्बर मार्गावरील काही फेर्या रद्द करण्यात येणार आहेत.