Breaking News

साईकृपाकडून शेतकर्‍यांची टींगलच - * आमदार राहुल जगतापांचा आंदोलनकर्त्यांना दिलासा

 श्रीगोंदा । प्रतिनिधी । 11 - श्रीगोंदा  हिरडगाव येथील साईकृपा साखर कारखान्याकडून 2014 - 15  गाळपासाठी करमाळा तालुका जि.सोलापूर येथून लाखो टन ऊस आणला परंतु करमाळा तालुका ऊस उत्पादक शेतकर्‍यांना 1 रुपया ही ऊसाचे बिल दिले नाही त्यामुळे शेतकर्‍यांनी दि.07 सप्टेंबर 2015 रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालया समोर आंदोलन केले’ त्यावेळी साईकृपा साखर कारखाण्यानी दि.10सप्टेंबर 2015 रोजी 78 लाख 31 हजार 740 रु चा चेक बँक ऑफ इंडिया शाखा वीट या नावाने दिला होता सोबत 77 शेतकर्‍यांच्या नावाची यादी दिली होती. परंतु सदर चेक  बँक ऑफ इंडिया शाखा वीट याठिकाणी जमा केला असता बँके मध्ये चेक वटलाच नाही तेव्हा शाखा अधिकारी यांनी सांगितले की साईकृपा कारखान्याच्या खात्यावर रक्कम शिल्लकच नाही हे ऐकून शेतकर्‍यांना मोठा धक्का बसला शेतकरी हताश झाला साईकृपा साखर कारखाना हिरडगाव या कारखान्याने शेतकर्‍यांची फसवणूक केलेली आहे   त्यामुळे शेतकर्‍यांना आत्महत्या करण्याची भीती वाटू लागली आहे. शेतकर्‍यांच्या मनात संतापाची भावना निर्माण झाली आहे. मात्र आता आमदार राहुल जगताप हे शेतकर्‍यांच्या न्यायासाठी लढणार असल्याने तसेच पेमेंट काढण्यासाठी शेतकर्‍यांना पाठींबा दिल्याने आता सर्वाचे लक्ष या प्रश्‍नाकडे लागले आहे.
गेल्या आठ दिवसापासून करमाळा तालुक्यातील शेतकरी श्रीगोंदा तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलनाला बसलेले असून श्रीगोंदा तालुक्याचे आमदार राहुल जगताप यांनी धरणे आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना श्रीगोंदा नगरपरिषदचे राष्ट्रवादीच्या नगरसेवका समवेत पाठींबा दिला. यावेळी धरणे करणार्‍या शेतकर्‍यांनी श्रीगोंदा तहसीलदार हे उसाच्या बिला विषयी पाठपुरावा करत नसल्याचे दिसून येते असे सांगितले. त्यावेळी आमदार राहुल जगताप हे म्हणाले की मी जिल्हाधिकारी साहेबांची समक्ष भेट घेऊन किवां फोनवर बोलणे करून यावर तोडगा काढतो, कारण की मी पण एका शेतकर्‍याचाच मुलगा असून माझी शेतकर्‍याशी नाळ जोडलेला आहे भला शेतकरी कुठल्याही तालुक्यातला असला तरी मला त्याची व्यथा कळते शेतकर्‍याने येव्हडे महिनतिनी ऊस उत्पादित करून साईकृपा साखर कारखान्याला दिला व त्या कारखान्याने त्या उसाचे गाळप ही केले पण शेतकर्‍याच्या खात्यावर पैसे जमा केले नाही.
ही खेद जनक बाब आहे आताची अवस्था इतकी बिकट आहे की ती फक्त शेतकर्‍यालाच माहित आहे माझा हा करमाळ्याचा शेतकरी बांधव त्याच घर लेकर - बाळ, आई - वडील सोडून श्रीगोंदा तहसील कार्यालया समोर बसलेला आहे ही बाब देखील खेद जनक आहे. या शेतकर्‍याचा घामाचा कष्टाचा मेहनतीचा पैसा आहे त्याच्यावर त्यांचा उदर निर्वाह आहे त्यात त्यांचा काय दोष आहे ते तर त्यांचे हक्काचेच पैसे माघतात मी त्यांना न्याय मिळून देणार असे आश्‍वासन धरणे आंदोलन कर्त्यांना आमदार राहुल जगताप यांनी दिले.