Breaking News

मुंबईत एका दिवसात 2 लाख जणांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी

मुंबई, प्रतिनिधी, दि. 11 - एकाच दिवशी सुमारे 2 लाख रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्याचा उपक्रम मुंबईत आयोजित केला जाणार आहे. आर. के.एचआयव्ही एड्स रिसर्च अँड केअर सेंटरने 28फेब्रुवारीला हे भव्य वैद्यकीय तपासणी शिबीर आयोजित केलं आहे. केंद्राचे अध्यक्ष डॉ. 
धर्मेंद्रकुमार आणि संचालक अजय बडगुजर आणि भाजपचे राष्ट्रीय सचिव आर. सी. रत्ना यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 28 फेब्रुवारी 2016 रोजी मुंबईतील सांताक्रुझ पश्‍चिम येथील बीएसएनलच्या मैदानावर हे मोफत वैद्यकीय निदान शिबीर घेण्यात येणार आहे. यात अनेक गंभीर तसंच जीवनशैलीशी संबंधित आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी या शिबीराच्या माध्यमातून  विविध सेवा देण्यात येणार आहेत. त्यादिवशी प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार रक्त तपासणी- सीबीसी, इएसआर, बीयूएन, हिमोग्लोबीन, सेरम क्रिएटनायन, रक्तातील साखर, एचआयव्ही चाचणी, हेपटायटीस ए, बी आणि सी तसंच लसीकरण सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. इसीजी,  डी एको- कार्डिओग्राम, एक्सरे, हाडांची तपासणीही करण्यात येणार आहे. गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटपही करण्यात येणार आहे.