राज्य सरकारची सलमानविरोधात सुप्रीम कोर्टात धाव
मुंबई, 23 - हिट अँड रन प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले.
राज्य सरकारने यासंदर्भात स्पेशल लिव्ह पिटीशन दाखल केली आहे. त्यामुळे सलमानच्या मागे पुन्हा कोर्टाचा फेरा सुरू झाला.
हिट अँड रन प्रकरणी मुंबई हायकोर्टाने सलमान खानची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर राज्य सरकार या निर्णयाला आव्हान देणार का याबाबत चर्चा सुरू झाली होती. अखेर राज्य सरकारने सलमानविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यामुळे सलमानच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत.