गायक आदर्श शिंदे यांना कन्यारत्नाचा लाभ
मुंबई : प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे आणि त्याची पत्नी नेहा लेले यांना कन्यारत्नाचा लाभ झाला. शिंदे घराण्याला महाराष्ट्रात सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे स्थान आहे. त्यांचे वडील आनंद शिंदे हे सुद्धा प्रसिद्ध गायक आहेत.
नेहा आणि आदर्श यांचा गेल्या मे महिन्यात विवाह झाला होता. नेहासुद्धा गायिका आहे. शिंदे घराण्यात ’अ’ अक्षरावरून नाव ठेवण्याची परंपरा आहे.