Breaking News

योजनांच्या अमंलबजावणीसाठी पंतप्रधानांना चांगल्या सल्लागारांची गरज - ज्येष्ठ वैज्ञानिक सीएनआर राव यांचे स्पष्ट मत


 बेंगळुरू/वृत्तसंस्था । 11 - आपल्या महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 
यांनी चांगला वैज्ञानिक सल्ला देणार्‍यांची गरज असल्याचे मत भारतरत्न पुरस्कार विजेते ज्येष्ठ वैज्ञानिक सीएनआर राव यांनी व्यक्त केले
आहे. पंतप्रधान मोदींचे वैज्ञानिक धोरण, असहिष्णुता आणि संत मदर तेरेसा यांच्याबद्दल राव यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत राव यांनी मोदींच्या धोरणांबद्दल हे वक्तव्य केले.
पंतप्रधान मोदी सरकारने अनेक योजना आणण्याचा सपाटा जरी लावला असला तरी त्या पुर्णपणे यशस्वी 
होतांना दिसत नाही अशा परिस्थितीत ज्येष्ठ वैज्ञानिक सीएनआर राव यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे. यावेळी राव म्हणाले की, पंतप्रधान मोदींना आपली धोरणे अंमलात आणण्यासाठी योग्य वैज्ञानिक 
सल्लागारांची गरज आहे. तसेच त्यांनी आता आपली धोरणे आमलात कशी येतील याकडे लक्ष दिले पाहिजे. मोदी हे काहीतरी करून दाखवतील यात शंकाच नाही. पण, योग्य सल्ल्याशिवाय या गोष्टी पूर्ण होवू शकत नाहीत. आपले पंतप्रधान सल्ल्यासाठी योग्य व्यक्तींची निवड करतील, अशी मला आशा आहे.