Breaking News

डॉन 3मध्ये कतरिना कैफची वर्णी !


मुंबई : प्रियंका चोप्राला शाहरुख खानच्या फिल्म ‘डॉन-3’ डच्चू देण्यात येणार असून तिच्या जागी कतरिना कैफ ची वर्णी लागण्याचे संकेत आहेत. या चित्रपटाच्या स्क्रिट लिहिण्याचे काम सुरू असून त्याचा तिसरा भाग 
पे्रक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटावर सध्या शाहरूख आणि फरहान अख्तर काम करत असून 
चित्रपटातील ‘जंगली बिल्ली’ म्हणून आता प्रियंका चोप्रा दिसणार नाही. या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे काही दिवसात शक्य होणार आहे.