वुईमेन्सच्या 2 हजार मुलींनी दिला आरोग्याचा संदेश
सांगली, 25 - येथील वुइमेन्स एज्युकेशन सोसायटीच्यावतीने मआरोग्यम् धनसंपदाफ या प्रकल्पांतर्गत संस्थेच्या सर्व शाळांतील विद्यार्थिनींच्या सामूहिक क्रीडा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. या नेत्रदीपक प्रात्यक्षिकात संस्थेच्या पूर्व प्राथमिक वर्गापासून ते एम. बी. ए. पर्यंतच्या दोन हजार विद्या
र्थिनींनी भाग घेतला होता. एकाचवेळी क्रीडा प्रात्यक्षिकांच्या या अभिनव उपक्रमास विद्यार्थिनींसह पालकांनीही दाद दिली. या कार्यक्रमास पाच हजारहून अधिक विद्यार्थिनींनी उपस्थिती लावली होती.
येथील तरुण भारत स्टेडियममध्ये झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी क्रीडा प्रात्यक्षिकात तायक्वांदोसह क्रीडा प्रकार सादर केले. यावेळी मंगळा गौर, बरची नृत्य, लेझीमसह वीस वेगवेगळे क्रीडा प्रकारही सादर करण्यात आले. उपक्रमाचे उद्घाटन खासदार संजयकाका पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, नवभारत शिक्षण मंडळाचे गौतम पाटील, संस्थेच्या अध्यक्षा मेधा भागवत, उपाध्यक्ष सुमन गाडगीळ, कार्यवाह उषा कुलकर्णी, प्राचार्य आर. जी. कुलकर्णी उपस्थित होते.