लासलगाव येथे 27 वे रस्ता सुरक्षा अभियान
लासलगाव/प्रतिनिधी। 20 - लासलगाव येथे, प्रादेशिक परिवहन विभाग नाशिक,भोलेनाथ मोटर ड्रायव्हिंग स्कूल व लासलगाव पोलीस स्टेशन यांच्या वतीने 27 वे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत गावाचे महत्वाचे ठिकाणी डीजीटल फलक लावण्यात आले. या फलकावर वाहतुकी चे नियम आहे या मध्ये मद्यपान करून वाहन चालवु नका,वेगावर नियंत्रण ठेवा हेल्मेट चा वापर करा,सीटबेल्टचा वापर करा,वाहन चालविताना मोबाईलचा वापर करु नका या मुळे मोठ्या प्रमानात अपघात टळतात. या प्रसंगी प्रादेशिक परिवहन विभाग नाशिक चे सहायक मोटार वाहन निरीक्षक मनीषा चौधरी व सहायक मोटार वाहन निरीक्षक ज्योती जाधव यांनी वाहतूकिचे नियमांची माहिती दिली.
समाज प्रभोदनाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचे महत्व लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य या माध्यमातून केले जात आहे. तसेच खैरे कॉम्प्लेक्स येथे भोलेनाथ मोटर ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक आनंता बबनराव सावंत यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन करून उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी उपस्थित लासलगाव पो.स्टे.चे पो.उ.नी.दीपक आवारे,शोभराज बागमार,विनोद चोरडिया, शैलेश गौर सुनील कुंदे अनिल वाघ वाहतूक चालक मालक संघटनेचे अध्यक्ष भारत माळी, रवी गोरे, जयवंत पवार, सलीम काजी, हिरामण कुटे, कुशारे,अनिल केदारे, शंकरराव कोल्हे, अयाज शेख, सचिन कुटेव बाबा अमरनाथ सोशल ग्रुप चे सदस्य मोठ्या संख्यात उपस्थित होते