Breaking News

शरद वझे यांचा 165 खेळाडूंसोबत बुध्दिबळ खेळण्याचा विक्रम नगरमध्ये करणार : फिरोदिया


 अहमदनगर । प्रतिनिधी । 12 - मुंबईचे बुध्दिबळ पटू शरद ओझे हे एकाच वेळी 165 खेळाडूंसोबत सलग 10 तास खेळणार आहेत. येत्या 23 जानेवारीला नगरमध्ये हा विक्रम ते नोंदविणार आहेत. त्यांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेचे उपाध्यक्ष तथा उद्योगपती नरेंद्र फिरोदिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बुध्दिबळ पटू ओझे, संघटनेचे सचिव तथा अंतरराष्ट्रीय किर्तीचे पंच यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, डॉ.अण्णासाहेब गागरे, श्याम कांबळे, आदी उपस्थित होते. 
अधिक माहिती देतांना फिरोदिया म्हणाले, ओम गार्डनमध्ये ही स्पर्धा होणार असून सकाळी 8 वा. सुरु होणार असुन रात्री 9 वा. संपणार आहे. जिल्ह्यातील राहाता, नेवासा, पाथर्डी तालुक्यातील खेळाडू वजे यांच्या सोबत खेळणार आहे. जिल्ह्यात बुध्दिबळाचा प्रसार व्हावा यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. वझे यांनी देशातील 8 राज्यातील 7500 पेक्षा जास्त खेळाडूसोबत सायमलटेनिस बुध्दिबळ स्पर्धा खेळली आहे. सलग 13 ते नगरमध्येच खेळलेले आहेत. या खेळात पुर्वीचा 150 तास खेळण्याचा विक्रम अभिजीत कुंडे यांच्या नावावर नोंदविलेला गेलेला आहे. नगरमध्ये मात्र 165 खेळाडूंसोबत खेळून त्यांचा विक्रम मोडला जाणार आहे. त्यासाठी वझे यांनी तयारी केली आहे. त्यांच्या सोबत खेळाणारे 165 बुध्दिबळपटू पैकी 40 जण आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलेले मानांकित खेळाडू आहेत. असे त्यांनी सांगितले.स्पर्धेत एकाच वेळी 165 खेळाडू पटावर बसतील, त्याचा वझे सामना करतील, प्रत्येक चालीची नोंद केली जाणार आहे. याचे पाच पंच निरक्षण करणार आहेत. पहिल्या खेळाडूपासून शेवटच्या खेळाडूपर्यंत जाण्यासाठी अवघे तीस मिनीटे लागणार आहेत. असा सलग 10 तास हा खेळ चालणार आहे. रेकॉर्डसाठीची औपचारिकता पुर्ण झाली आहे. बुध्दिबळात ग्रॅडमास्टर हा मानाचा किताब मानला जातो. राहुरीच्या शार्दुळ गागरेच्या दृष्टीक्षेपात हा पुरस्कार आला आहे. हा किताब मिळवण्यासाठी त्याला केवळ दोन गुण कमी आहेत. 17 जानेवारीला चेन्नई येथे स्पर्धा होत आहे. तर 28 जानेवारीला मुंबईत चॅम्पियनशिप होणार आहे. हे गुण तो नक्कीच मिळविले असा बुध्दिबळपटू सह नगरकरांना आहे. त्याच्या विजयाचे सेलिब्रेशन बुध्दिबळ संघटनेच्यावतीने निश्‍चित केले जाईल असे नरेंद्र फिरोदिया यांनी स्पष्ट केले.