Breaking News

रशियाने इसिसच्या धोक्याविषयी थायलंडला केले सतर्क

isis1
बँकॉक : रशियाच्या सर्वोच्च हेर यंत्रणेने इस्लामिक स्टेटच्या १० दहशतवाद्यांचा समूह रशियन नागरिकाना लक्ष्य बनविण्यासाठी देशात घुसल्याचा इशारा दिल्याचे थायलंड पोलिसांनी सांगितले. थायलंडच्या विशेष शाखेच्या उपप्रमुखांच्या स्वाक्षरीवाल्या एका पत्राविषयी माहिती समोर आली होती. या पत्रावर गोपनीय आणि तत्काळ लिहिलेले होते.
मॉस्कोच्या एफएसबीने इस्लामिक स्टेटच्या १० सीरियन दहशतवाद्यांनी रशियन हितांना लक्ष्य करण्यासाठी १५ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान थायलंडमध्ये प्रवेश केल्याची माहिती दिल्याचे यात म्हटले गेले होते. रशियन पर्यटकांसाठी विशेषकरून ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या सुट्यांच्या व्यस्त काळात थायलंड एक पसंतीचे ठिकाण आहे. रशियाच्या हेर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी वेगवेगळा प्रवेश केला आहे. ४ जण पटाया, २ जण फुकेत, २ जण बँकॉक आणि २ अन्य ठिकाणावर गेले आहेत. त्यांचा उद्देश रशियन नागरिक आणि रशियाच्या थायलंडसोबतच्या आघाडीला प्रभावित करण्यासाठी स्थिती खराब करणे आहे.