Breaking News

भारत खरेदी करणार ३ आण्विक पाणबुड्या

submarine
नवी दिल्ली : भारताने हिंदी महासागरात चीन आणि पाकिस्तानला थेट टक्कर देण्यासाठी तयारी केली असून यासाठी फ्रान्सकडून आणखी ३ स्कॉर्पियन आण्विक पाणबुड्या भारत खरेदी करणार आहे. माझगाव डॉकवर भारताच्या ६ पाणबुड्या उभ्या आहेत आणि ६ न्यू जनरेशन स्टील्थ सबमरीनसाठी पुढील वर्षांपर्यंत निविदा काढली जाईल. हिंदी महासागरात चीन भारतासाठी एक आव्हान म्हणून समोर येत आहे.
हिंदी महासागरात सागरी सीमेची सुरक्षा आणि देखरेख करणे हे भारताचे महत्त्व लक्ष्य आहे तसेच अंदमान आणि निकोबार बेटानजीकच्या मलाक्का स्टेटमध्ये भारताच्या सामरिक हितांचे रक्षण करण्याची जबाबदारी नौदलावर आहे. या क्षेत्रात चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाला रोखण्यासाठी सध्या तयारी केली जात आहे. हिंदी महासागरात चीनच्या पारंपरिक आणि आण्विक पाणबुडीच्या उपस्थितीमुळे भारताला ठोस निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे.
चीनजवळ ५१ पारंपरिक आणि ५ आण्विक पाणबुड्या आहेत. याशिवाय चीन ५ आणखी नव्या जेआयएन श्रेणीच्या आण्विक पाणबुड्यांना आपल्या ताफ्यात सामील करणार आहे. यात ७४०० किलोमीटरपर्यंत मारा करणारी जेएल-२ क्षेपणास्त्री लावण्यात आली आहेत. पाकिस्तानदेखील भारतासाठी एक नवे आव्हान म्हणून समोर येत आहे. इस्लामाबादने अलिकडेच बीजिंगला ८ आधुनिक डिझेल इलेक्टिड्ढक पाणबुडीची ऑर्डर दिली आहे.