Breaking News

२०१७ साली ‘आयएनएस विराट’ची निवृत्ती!

ins-viraat
मुंबई – २०१७ साली भारतीय नौदलातून २८ वर्षापासून भारतीय नौदलाच्या सेवेत असलेली ‘आयएनएस विराट’ ही विमानवाहू युद्धनौका निवृत्त होणार यावर शिक्कामोर्तब झाले असून ब्रिटिश रॉयल नेव्हीमध्ये १८ डिसेंबर १९५९ रोजी दाखल झालेली ‘एचएमएस हर्मिस’ ही युद्धनौका भारताने १९८७ साली खरेदी केली होती. तिचे नामकरण ‘आयएनएस विराट’ असे करण्यात आले होते.
त्या युद्धनौकेची डागडुजी ब्रिटनमधील डेव्हनपोर्ट गोदीमध्ये करण्यात आली. त्यानंतर त्यावरील यंत्रणा बदलण्यात आल्या आणि ती युद्धनौका ‘आयएनएस विराट’ या नावाने १२ मे १९८७ रोजी भारतीय नौदलात दाखल झाली. त्यानंतर आजपर्यंत तब्बल २८ वर्षे ‘ विराट’ सेवेत असून तिच्या निर्मितीपासून ५८ वर्षे सेवा बजावली आहे. एवढी दीर्घकाळ सेवा बजावणारी ही एकमेव विमानवाहू युद्धनौका आहे. दरम्यान, या युद्धनौकेचे संग्रहालयामध्ये रूपांतर करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने तयारी दर्शविली आहे.