Breaking News

लाखो भीम अनुयायी चैत्यभूमीवर

baba
मुंबई : आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि लालकृष्ण अडवणींनीसह सर्व प्रमुख नेत्यांनी दिल्लीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर अलोट गर्दी उसळली आहे.
६ डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाणदिन; परंतु महामानवाला अभिवादन आदल्या रात्री १२ वाजता केले जाते त्यामुळे चैत्यभूमीवर अनुयायांच्या रांगाच रांगा दर्शनासाठी लागल्या होत्या. महामानवाला अभिवादन करण्यासाठी बालकापासून ते वृद्धांपर्यंत येत असतात. त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिका खबरदारी घेत असते. चैत्यभूमीवर येणा-या अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून ठिकठिकाणी निवारे उभारण्यात आले आहेत शिवाय एलईडी स्क्रीनस, वेगवेगळे कक्ष त्यामध्ये अग्निशमन दलापासून ते आरोग्य, माहिती, केबल, स्वछ भारत अभियान, अशा विविध कक्षांचा समावेश आहे. लाखो अनुयायी येत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाच्या ठिकाणी अभिवादन कमानी उभारल्या आहेत.