Breaking News

रहाणेचे सलग दुसरे शतक

ajinky
नवी दिल्ली- चौथ्या आणि अंतिम कसोटीच्या दुस-या डावातही अजिंक्य रहाणेने दमदार शतक झळकावले. २६७ धावांवर भारताने डाव घोषित करत आफ्रिकेसमोर विजयासाठी ४८१ धावांचे आव्हान ठेवले. एकाच कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये शतक ठोकणारा अजिंक्य रहाणे पाचवा भारतीय ठरला आहे.
रहाणेने दिल्लीच्या फिरोजशा कोटला मैदानावर सुरू असलेल्या चौथ्या कसीटी सामन्यात पहिल्या डावात १२७ धावा काढून दमदार शतक झकळवले होते. दुस-या डावातही रहाणेने २०८ चेंडूसह आठ चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद शतक झळकावले. एकाच कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये शतक ठोकण्याचा पराक्रम रहाणेने केला. याआधी विजय हजारे, सुनील गावस्कर, राहुल द्रविड आणि विराट कोहली यांनी ही कामगिरी बजावली होती. टीम इंडियाने दुस-या डावात पाच बाद २६७ धावांवर डाव घोषित केला असून, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ४८१ धावांचे आवाहन ठेवले. विराट कोहली ८८ धावांवर माघारी परतला.