Breaking News

कोहली, धवन खेळणार गंभीरच्या नेतृत्वात

combo
नवी दिल्ली : गौतम गंभीरच्या नेतृत्वात भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली, शिखर धवन आणि ईशांत शर्मा हे तीनही खेळाडू खेळणार आहे. हे तिघेही उत्तर विभागाकडून विजय हजारे चषकातील एकदिवसीय सामन्यात खेळणार असून स्पर्धेला १८ डिसेंबरपासून दिल्लीत सुरुवात होणार आहे.
विनय लांबा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने दिल्ली संघाची घोषणा केली आहे. तसेच अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याची एकदिवसीय संघात निवड करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान मालिका अधांतरी असल्याने कोहली, ईशांत आणि धवन यांची निवड करण्यात आली आहे. तर ऑस्टड्ढेलिया विरुद्धच्या क्रिकेट मालिकेसाठी एका महिन्याचा अवधी शिल्लक आहे.
आम्ही गंभीरला अगोदरच संघाच्या कर्णधारपदी नियुक्त केल्याचे लांबा यांनी सांगितले असून गंभीरच्या नेतृत्वात खेळल्यास कोहलीला जास्त फरक पडणार नसल्याचे लांबा यावेळी म्हणाले.
संघ : गौतम गंभीर (कर्णधार), उन्मुक्त चंद, शिखर धवन, विराट कोहली, नितीश राणा, मिलिंद कुमार, मनन शर्मा, पवन नेगी, आशिष नेहरा, प्रदीप सांगवान, ईशांत शर्मा, नवदीप सैनी, सुबोध भाटी, शिवम शर्मा, राहुल यादव (यष्टीरक्षक) (राखीव खेळाडू : ध्रुव शोरे, वैभव रावल, विकास टोकस)