Breaking News

मूत्रपिंड रुग्णांना राज्य सरकारचा दिलासा

sudhir-mungantiwarsudhir-mungantiwar
मुंबई – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मूत्रपिंड विकाराने त्रस्त असलेल्या राज्यातील हजारो रुग्णांना डायलिसिससाठी लागणारी यंत्रसामुग्री आणि औषधे करमुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना सरकारच्या या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
आजवर राज्यात कर्करोग आणि मूत्रपिंड विकारावरील उपाचारासाठी लागणाऱ्या औषधांवर विविध प्रकारचे कर लावले जात होते. हे उपचार मुळातच खर्चीक असल्याने गोरगरीब रुग्णांना ते परवडत नसल्यामुळे अशा रुग्णांना दिलासा देण्यासाठी कर्करोगावरील उपचारासाठी लागणाऱ्या औषधांना करमाफी करण्याचा निर्णय सरकारने काही महिन्यांपूर्वी घेतला होता. त्याच वेळी मूत्रपिंड विकाराशी संबंधित औषधे आणि उपचारासाठी लागणाऱ्या यंत्रावरील सर्व कर रद्द करण्याची मागणी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली होती. त्या वेळी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. त्यानुसार मूत्रपिंड आजाराने त्रस्त रुग्णांना उपचारार्थ लागणाऱ्या १३ जेनरिक औषधे तसेच उपकरणांना विविध करांतून मुक्त करण्याचा निर्णय अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी घेतला.