Breaking News

पोंभुर्णा येथे डशबोर्ड संचेतन मेळावा संपन्न


पोंभुर्णा पंचायत समितीच्या सभागृहात डशबोर्ड संचेतन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेचे सादरीकरण तालुका प्रकल्प समन्वयक डॉ.दिनेश वाळके यांनी केले. मार्गदर्शन करतांना म्हणाले कि, डेटा एक्स्पेंशन प्रोग्राम अंतर्गत फेब्रु. २०१८ मध्ये जमा करण्यात आलेल्या डेटा वरुन सदर डशबोर्ड व गाव विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. संबंधित विभागाला जी आयडी देण्यात येईल त्या आयडी वरुण आपण आपल्या गावातील माहिती बघून त्याची निश्चिती करुण घ्यावा. त्यामध्ये सुधारणा करावयाची असल्यास नंतर सुधारणा करू शकता. तसेच संबंधित डेटा आपण पुढील नियोजना साठी त्याचा वापर करून गाव विकास आराखडा तयार करू शकतो. सदर डशबोर्ड हा यूजफुल असल्याने याचा वापर करने अत्यंत सोपे आहे. तसेच या बाबत ग्रामस्त वापर कसा करतील याकडे लक्ष देने गरजेचे आहे. त्यामधील अपडेशन करणे हे अत्यंत महत्वाचे असून त्याचा उपयोग गावातील सुशिक्षित लोक करतील व गाव विकासाच्या प्रक्रियेत मोलाचा हातभार लावतील अशी अपेक्षा आहे.