Breaking News

कोरेगाव भीमाप्रकरणी शपथपत्रे सादर करण्याचे आदेश

पुणे : कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगाकडे आतापर्यंत 177 शपथपत्रे विविध व्यक्ती, संघटनांनी दाखल केली आहेत. शपथपत्र दाखल करण्यासाठी आयोगाने मुदत वाढवून दिली असून आता 16 जुलैपर्यंत शपथपत्रे सादर करता येतील. दंगलीच्या चौकशीसाठी शासनाने क ोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जे़ एऩ पटेल आणि राज्याचे मुख्य सचिव यांची चौकशी समिती फेब्रुवारी महिन्यात नेमली आहे. या समितीला चार महिन्यात चौकशी करुन अहवाल द्यायचा आहे़चौकशी आयोगाने 12 मे रोजी जाहीर आवाहन करुन ती घटना, त्या घटनेपूर्वीच्या आणि त्यानंतरच्या अशा इतर संबंधित घटनांबद्दलची माहिती असलेल्या व्यक्ती, त्या घटनेमुळे बाधित झालेल्या व्यक्ती तसेच संघटना, राजकीय पक्ष यांच्याकडून शपथपत्राच्या स्वरुपात त्यांचे म्हणणे सादर क रण्यास सांगितले होते. त्यासाठी 10 जूनपर्यंत मुदत होती. या मुदतीत आयोगाकडे पुणे कार्यालयात 169 शपथपत्रे तर मुंबईतील कार्यालयात 8 शपथपत्रे सादर झाली.