Breaking News

इज्तेमा - एक दृष्टीक्षेप

आंतकवादी, दहशतवादी, जेहादी, आक्रमक अशा नाना दुषणांनी ज्या समाजाला अलिकडच्या काळात नको तितके बदनाम केले गेले. ही बदनाम करणारी मंडळी कोण आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आणि आज त्याचे औचित्यही नाही. चार दोन वर्षापुर्वी प्रत्येक पकडला जाणारा आंतकवादी हा मुसलमान असतो म्हणून सारा मुस्लिम समाज दहशतवादी आहे असा संदेश जाणीवपुर्वक पेरून अन्य धर्मीयांच्या मनात या समाजाविषयी विष कालवून प्रत्येक मुस्लिम व्यक्तीकडे संशयाने पाहण्यास मजबूर केले गेले होते. या शांतीचा ठेका घेतलेल्या मंडळींच्या दहशतवादाच्या व्याख्येच्या परिमाणात बसणार्‍या कारवाया फक्त मुस्लिम समाज करतो का? 


एखादे बांडगूळ निपजले म्हणून अवघा समाज वेठीस धरायचा का? या प्रश्‍नांची उत्तरे हे ठेकेदार आज पर्यंत देऊ शकले नाहीत. उद्याही देऊ शकणार नाहीत. कारण वस्तूस्थिती ते दाखवितात तशी मुळीच नाही. वस्तूस्थितीचा विपर्यास करून परिस्थितीला विस्फोटक बनविण्याचे तंत्र विकसीत करण्यासाठी हा उपदव्याप ही मंडळी करीत असते. वर्तमानातच नाही तर इतिहासापासून सियासतच्या राजक ारणाला अंजाम देण्यासाठी धर्म मार्तंडाची टोळी कार्यरत आहे, एकाच बाजूने हे कृष्ण कृत्य केले जाते असेही नाही, दोन्ही बाजूचे कथित धर्मप्रेमी यात हिरिरीने सहभागी असतात. असोत बिचारे! त्यांची दखल घेतली तर आणखी चेव येतो. म्हणून सोयीस्कर दुर्लक्ष करून धर्म ग्रथांनी, धर्म पुरूषांनी सांगीतलेल्या आदर्श तत्वांची जपणूक करीत समाजाला खर्‍या धर्माच्या मार्गावर आणणारे जोपर्यंत सजग आहेत तो पर्यंत या दुष्ट शक्ती त्यांच्या कारवायांना अंजाम देण्यात यशस्वी होणार नाहीत. कुठलाही धर्म, पंथ मानवतेच्या हिताला बाधीत करीत नाही. माणूस आधी, त्यानंतर जन्मभुमी आणि तिसर्‍या क्रमांकावर ज्याचा त्याचा धर्म ही शिकवण प्रत्येक धर्माने दिली. हे ज्यांना कळते त्यांना कधीही कुठल्याही धर्माच्या भिंती रोखू शकत नाहीत.
संभाजीनगरमध्ये दि. 24, 25 आणि 26 फेब्रूवारी रोजी जे अदभूत चित्र सार्‍या जगाने पहिले त्यातून हाच संदेश प्रतिध्वनित झाला आहे. हे दिवस जगाच्या पाठीवरील जवळपास पंचवीस देशातील पाऊण कोटीचा जनसमुदाय इज्तेमा म्हणजे जाहिर अधिवेशनासाठी आला होता. समाज कुठला ? तर एरवी व्यवस्थेच्या संशयीत नजरा नेहमी ज्याच्यावर खिळलेल्या. एव्हढ्या मोठ्या संख्येने एकत्र येणार म्हणजे नक्कीच काहीतरी भयानक घडणार, घडविले जाणार....या मातीचा धर्म असलेल्या मुळ धर्माला आव्हान दिले जाणार अशा काही कुशंका विशिष्ट सडक्या विचारांना आल्याही असतील. पण ते शक्य नव्हते, कारण या ठिकाणी आलेल्या जनसमुदायाच्या मनावर त्यांच्या धर्मग्रथांनी, धर्मपुरू षांनी ठाम कोरलेले होते की मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना. आपण जिथे जन्माला आलो, जिथे वाढलो, जी आपली जन्म भुमी कर्मभुमी आहे तोच आपला पहिला धर्म. आधी वतन. त्यांनतर मनुष्य अल्लाह म्हणजे इर्श्‍वराचे लेकरू. परस्परांमध्ये स्नेह वर्धन करून शांती म्हणजे अमन प्रस्थापित करणे ही सर्वांची तशी या जनसमुदायाचीही शिकवण. खिदमत म्हणजे आदरातिथ्य. अतिथी देवो भव...तसे गरजवंताला मदतीचा हात देणे. अशा मानवतेच्या मुळ संकल्पनांना साद घालून जेजे धर्माग्रंथात विषद आहे त्यावर अंमल क रण्यासाठी समुदाय गेले तीन दिवस संभाजीनगरच्या परिसरात विसावला होता. धर्मगुरूंच्या प्रेषीत वाणीतून प्रसवलेल्या अमृताचा थेंब न थेंब ग्रहण करीत या जनसमुदायाने तिनही दिवस मानवतेचे अदभूत उदाहरण जगासमोर ठेवले.
केवळ उपदेशावर या मंडळींची सेवेची भुख थांबली नाही. तर प्रत्यक्षात तिनशेहून अधिक विवाह लावून अनेक नव्या संसारांना संजीवनी दिली. खरेतर संभाजीनगरकडे हे जत्थे मार्गस्थ होत असताना माराठी माणसाचे मन कुतूहलाने प्रफुल्लीत होऊन माहिती घेण्याचा प्रयत्न करीत होते. पाठीवर भलेमोठे बॅग, पिशव्या, गाठोडं वगैरे घेतलेले कुर्ता, पायजामा घातलेले लांब लांब दाढी, टोपीवाल्यांचा जत्था रस्त्याने होते. जत्थे म्हणजे काही मोजक्या यशस्वी मुस्लिम चळवळीपैकी एक ती चळवळ आहे - तबलिगी जमात. सन 1927 मध्ये हरयाणाच्या मेवात शहरात मौलाना इलियास कांधीलवी यांनी याची स्थापना केली. विशेष म्हणजे ही संघटना किंवा सांप्रदाय नसून फक्त एक चळवळ आहे. याचं केंद्र दिल्ली येथे निजामुद्दीन परिसरात मुख्यालयात आहे. मौलाना साद हे सध्या याचे सुप्रीमो आहेत. भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ व इतर दक्षिण आशियाई देश यांचे प्रमुख क ार्यक्षेत्र आहेत. भारतीय उपमहाद्विपात इतरांच्या अंधानुकरणातून काही कर्मकांडे मुस्लिम समाजात घुसल्याने अनेक रूढी परंपरांच्या आहारी इथला समाज गेला होता. त्यात सुधारणा करून खरा इस्लाम लोकांना समाजाऊन सांगणे, नमाज पढण्याची पद्धत शिकवणे, तसेच दारूबंदी, व्यसनमूक्ती, व्यभिचारमूक्ती व इतर वाईट सवयींच्या निर्मुलनाकरिताही यात प्र शिक्षण दिले जाते. यांचे कुठेही स्थानिक कार्यालय नसते. गावा-गावात जत्थे (जमात) बनवून मशिदीत काही दिवस मुक्काम करतात, तिथल्या स्थानिक लोकांचं प्रबोधन करतात आणि तिथल्या काही स्थानिक लोकांना सामील करून तो जत्था पुढे जातो. तीन दिवस, दहा दिवस, 40 दिवस किंवा 4 महिने असे वेगवेगळ्या कालावधीचे प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार या जत्थ्यात योगदान देत असतो. ज्याचा कालावधी पूर्ण झाला तो घरी निघून जात असतो आणि नवीन जुळलेल्या साथीचा कालावधी सुरू होत असतो. अशाप्रकारे हे जत्थे एकाचवेळी जगभरात भ्रमण करत असतात. लोकं बदलत असतात पण जत्था (जमात) तीच राहते. काही जमात एकमेकांत सहभागी केले जातात तर काही जमाती मोठ्या झाल्या की त्याचे दोन तीन गटांत विभागणी करून वेगवेगळ्या दिशेने पाठविले जातात. याचे नियोजन करण्यासाठी कुठेतरी वर्षातून, महिन्यातून जोड हा कार्यक्रम ठेवला जातो. जत्थाचा एक स्थानिक अमीर (प्रमुख) निवडला जातो. जागोजागी रोज मशिदीत दिवसातून एकदा मशवरा (सल्लामसल्लत) होत असते. मुस्लिम वस्तीत प्रत्येक नमाज नंतर गस्त घातली जाते. घरोघरी जाऊन प्रबोधन केले जाते, नमाजसाठी आमंत्रित केलं जाते तसेच जमातसोबत दुसर्या गावी निघण्याकरिता आग्रह केला जातो. अशाप्रकारे ही जमात म्हणजे धार्मिक प्रौढ शिक्षणासाठी एक चालती बोलती शाळा (मदरसा) आहे. आता मौलाना कलीम सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली काही ठिकाणी या चळवळीच्या कक्षा रूंदावल्या आहेत. आता ते एक गस्त मुस्लिम वस्तीत तर एक गस्त मुस्लिमेतर वस्तीत घालत असतात. 
या जमाअतचे लोकं दर्गाहवर जाणे, तिथं नवस वगैरे फेडणे वगैरे गोष्टींना मानत नाही. ही एक गैरराजकीय चळवळ आहे. इतर लौकिक बाबतीत कोणतीही चर्चा किंवा वक्तव्य करत नाही. फक्त धार्मिक आणि त्यातल्या त्यात नमाज पढण्यावरच ही जमात जास्त भर देते. यांच्या इज्तेमा (जाहिर अधिवेशन) मध्ये वक्त्याचे नाव दिलेले नसते तर फक्त बयाण (भाषण) आणि त्याची वेळ दिलेली असते. लग्नकार्यात उधळपट्टी नको, आई वडिलांची सेवा, पती पत्नीचे अधिकार, लेकरांचे संगोपन, हलाल क माईचे महत्व, प्रबोधनाची गरज, त्यासाठी त्यागाचे महत्व, नमाजचे महत्व यासारखे त्यांच्या भाषणाचे विषय असतात. मात्र अमीरचा आदेश, वेळेचं नियोजन वगैरे यांची शिस्त वाखाणण्याजोगी आहे. इज्तेमाच्या शेवटी स्वतःसाठी, समाजासाठी, देशासाठी आणि संपूर्ण जगासाठी एक एक - दोन दोन तास दुवा मागितली जाते. सर्वसाधारणपणे देवबंद, नदवा, अक्कलकुवा वगैरे मदरस्यातील उलेमा(विचारवंत), मौलवी हे यांचे मार्गदर्शक असतात. जमातमध्ये सोबत प्रवासात असतांना हे एकमेकांशी ज्याप्रमाणे सौजन्याने वागतात, ते कौतुकास्पद आहे. 
जमातबांधनीसाठी सोशल मीडियाचा वापर, व्हिडिओ, फोटोचा वापर वगैरे आधुनिक बदलही आता यात होत आहेत, ही सकारात्मक परिवर्तनाची नांदी आहे. संभाजीनगर येथे नुक तंच संपन्न होत असलेला इज्तेमामध्ये या जत्थांनी केलेले शिस्तीचे प्रदर्शन गर्दीच्या नियोजनाचा आभ्यास करणार्या अभ्यासार्थींसाठी म्हटल तर कार्यशाळा ठरेल. पावण कोटीची जनसंख्या असूनही त्यांच्या वाहनांमुळे कुठेही वाहतूक कोंडी नाही. शहरात ट्रॅफिकचे उत्तम असे नियोजन करणारे स्वयंसेवक, जागोजागी मोफत बसेसची आणि नाश्ता पाण्याच्या व्यवस्थेमुळे शहरावर जराही ताण दिसला नाही, ही त्यांच्या कार्यकुशलतेची पावती ठरली. या इज्तेमाच्या निमित्ताने मुस्लिम समाजाची एक सकारात्मक प्रतिमा उजळून आली आहे, जी इतरांसाठी आदर्श आहे.