Breaking News

हरीगावातील नागरिकांना अखेर शौचालय अनुदान मंजू


श्रीरामपूर तालुक्यातील हरिगाव येथील नागरिकांनी शौचालये बांधून ठेवली परंतु बरेच दिवसापासून शेती महामंडळ,व बेलापूर साखर कारखाना उद्योग समूह हरिगाव यांच्याकडून न हरकत दाखला मिळत नसल्याने बराच काळ प्रतीक्षा करावी लागली.त्यातच न्यायालय प्रक्रिया,दावे दाखल,अशा कारणाने हा प्रस्ताव प्रलंबित होता.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय अनुदान मिळण्यास अडचणी होत्या.अशा परिस्थितीत हरिगाव ग्रामपंचायत सरपंच सौ अनिता रमेश भालेराव,उपसरपंच प्रतिभा गड्वे,माजी सरपंच दिलीप त्रिभुवन,ग्रा.प.सदस्य दीपक नवगिरे,ग्रामविकास अधिकारी एम बी शेळके,यांच्या विशेष पाठपुराव्यातून शासन स्तरावर हा प्रश्न मार्गी लागला.याकामी गात विकास अधिकारी मोहन जाधव,स.गटविकास अधिकारी काळोखे,सभापती दिपाकअण्णा पटारे,यांनी अतिशय प्रयत्न करून प्रश्न मार्गी लावला व आतापर्यंत ३८८ नागरिकांची शौचालये मंजूर झाली असून १५० नागरिकांनी शौचालय बांधकाम पूर्ण केले आहे.तर उर्वरित प्रगतीपथावर आहेत.त्यापैकी २६ नागरिकांना प्रत्येकी रु १२०००/-शौचालय लाभ मिळाला आहे.हरिगाव ग्रामस्थांना शौचालय अनुदान मिळाल्याने आनंदाचे वातावरण आहे.ज्या नागरिकांची नावे यादीत नाहीत त्यानाही नरेगा योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार आहे.