Breaking News

बाजार समितीची वार्षिक उलाढाल ५०० कोटींवर!


राहाता / बाळासाहेब सोनवणे 

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ‘ई-मंडी’ अव्वल स्थानावर आहे. देशपरदेशातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य या ठिकाणी येऊन अभ्यास करु लागले आहेत. या बाजार समितीची उलाढाल सुरुवातीला ८ कोटी होती. आजमितीला या बाजार समितीची वार्षिक उलाढाल ५०० कोटींच्यावर गेली आहे. 

पद्मभूषण स्व. खा. बाळासाहेब विखे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, युवानेते सुजय विखे, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांच्या मार्गदर्शनाखाली या बाजार समितीची १५ जून २००४ रोजी स्थापना करण्यात आली होती. तालुक्यातील ६० गावांचे या बाजार समितीचे कार्यक्षेत्र आहे. या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी सुरुवातीपासून अत्यंत पारदर्शी कारभार या बाजार समितीत सुरु केला. त्यामुळे या बाजार समितीने लावलेल्या छोट्याशा रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या प्रयत्नाने या बाजार समितीत भुसार मालाची व धान्य मालाची ई-मंडीत लिलावास राज्यात प्रथम सुरुवात झाली. याचे अनुकरण इतर राज्य व देशातील सर्व बाजार समित्या आता करीत आहेत. या ई-मंडी पध्दतीमुळे शेतकरी व व्यापाऱ्यांना शेतमालाची विक्री करण्यास अतिशय सोपे झाले आहे. शेतकऱ्यांनी आणलेला माल व्यापारी दुकानात बसून इंटरनेटद्वारे त्याचे भाव ठरवतात. संपूर्ण देशात इंटरनेटमुळे ऑनलाईन विक्री करण्यास मोठी मदत झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आणलेला माल हा विक्री करण्यासाठी पारदर्शीपणा आला असल्याने शेतकऱ्यांचा व व्यापाऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा वाद होत नाही. शेतक­यांना आपल्या मोबाईलवर आपला माल कोणत्या व्यापा­यांकडे विक्रीसाठी ठेवला आहे, याची माहिती तात्काळ मिळते. वेबसाईट ओपन केल्यावर राहाता बाजार समितीने आणलेल्या मालाच्या विक्रीची माहिती ऑनलाईन पध्दतीने संपूर्ण देशात सर्व व्यापा­यांना व शेतकऱ्यांना समजते. त्यामुळे ही बाजार समिती संगणकयुगात मागे न राहता देशात आता अव्वल स्थानावर आहे.

चौकट 

डाळिंब विक्री केंद्र लवकरच 

या बाजार समितीचे संगणकीकृत कार्यालय, सर्व बाजूंनी संरक्षण भिंत तसेच कार्यालय परिसरात करण्यात आलेले वृक्षारोपण, 

सुसज्ज आणि प्रशस्त असे अंतर्गत रस्ते अशा विविध प्रकारच्या सुविधा शेतकऱ्यांसाठी बाजार समितीने उपलब्ध करून दिल्या आहेत. बाजार समिती खडकेवाके येथे लवकरच स्वतंत्र जागेत डाळिंब विक्री केंद्र सुरु करणार आहे.

बापूसाहेब आहेर, अध्यक्ष, राहता कृ.उ.बा. समिती.