Breaking News

शेतकऱ्यांना बियाणे दरवाढीचा फटका


शिर्डी / प्रतिनिधी : अद्यापपर्यंत म्हणावा असा पाउस पडला नाही. यापुढे किती पडेल, याची खात्री नाही आणि जे पेरले ते उगवेल, त्याला चांगला भाव मिळेल, याचीही खात्री नाही. अशा दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना यावेळी खरिपात बियाणांच्या दरवाढीचा झटका बसत आहे.

शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करत मका बियाणाच्या कंपनीने यावेळी चार किलोच्या पिशवीमागे १०० ते २०० रुपयांनी वाढ केली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे. कांदा बियाणात किलोमागे १०० ते २०० रुपये तर मूगाच्या पिशवीमागे २५ रुपयांनी वाढ झाली आहे. उत्तर नगर जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र मोठे असले तरी शेतकरी आता कांदा, मका यांसारखे पिकेही घेतात. याच पिकाच्या दरवाढीमुळे खरिपासाठी कर्ज मिळत नाही. नगर जिल्ह्यात विविध तालुक्यात शेतकरी पिक घेताना आपल्या पद्धतीने पिके घेतात आता बागायती पट्ट्यात ही कांदा व मका शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेतात कमी पाउस झाला तरी ही पिके जिवंत राहतात मक्याला राज्यात देशात व परदेशातून ही मागणी असते उत्पादनासाठी कमी खर्च व अधिक उत्पन्न यामुळे शेतकरी या पिकांना पसंती देतात. मका बियाणे उत्पादक कंपन्यांनी २०१४ मध्ये बियाणे पिशवी १ किलोने कमी करत चार किलोवर आणली. 


अन्यथा शेती अडचणीतच 

बियाणे असो की औषधे. यात वाढ झाली असून पावसानंतर आणखी मागणी वाढणार आहे. शेती व्यवसायाला पाठबळ देण्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. तो घेतला तर शेतकरी शेती व्यवसायावर टिकू शकेल. अन्यथा शेती व्यवसाय अडचणीत आलेला आहे तो आणखी आल्याशिवाय राहणार नाही. 

विजय कातोरे, शेतकरी, निमगाव.