Breaking News

अग्रलेख - उद्योगव्यवस्थेचे केंद्रीकरण


आर्थिकस्तर उचांवला की माणसाची क्रयशक्ती वाढते, हा अर्थशास्त्रांचा साधा नियम लक्षात न घेता देशात आर्थिक गुतंवणूक कशी वाढेल याकडेच आजच्या सरकारने मोठयाप्रमाणात लक्ष दिले आहे. मात्र त्यामुळे बाजारपेठ एका विशिष्ट वर्गाच्या हातात राहण्यास अप्रत्यक्षपणे मदतच झाली आहे. सर्वसामान्यांच्या हाती देखील पैसा खुळखुळण्याऐवजी तो विशिष्ट वर्गाच्या हाती जात असल्यामुळे आपले विदेशी गुतंवणूकीचे धोरण किती तकलादू आहे हे लक्षात येते. भारतीय उद्योजक सतत उद्योगांसाठी वेगवेगळ्या सवलतींची मागणी करत असतात. या सवलतीमधून प्रचंड प्रमाणात आर्थिक फायदा मिळवूनही भारतीय उद्योजक निर्यात उद्योगामध्ये पुरेसे यश मिळवू शकले नाहीत. याला प्रामुख्याने यापूर्वीच्या सरकारच्या जबाबदारीला जसे कोट केले त्या प्रमाणेच उद्योजकांनीही आपल्या उद्यमशिलतेला पुरेसा वाव न दिल्याचे स्पष्ट केले. भारतातील मोठमोठे उद्योजक नविन कल्पक उद्योग निर्माण करण्याऐवजी मॉल निर्माण करुन कांदे-बटाटे विकू लागले आहेत. उद्योजकांना देश उभारणीत जबाबदार भूमिका निभावण्यासाठी आव्हान करतांनाच के वळ स्वत:च्या आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करण्याचे त्यांनी टाळले पाहिजे यावरही भाष्य केले. सरकार हे प्रामुख्याने सामान्य जनतेसाठी असते. त्या जनतेचा आर्थिक विकास हि राष्ट्राची जबाबदारी असते. त्या जबाबदारीतूनच सरकार उद्योजकांना वेगवेगळ्या सोयी सुविधा पुरवित असतात. या सोयी-सुविधांचा लाभ घेत असतांनाही रोजगारात वाढ होत नसल्याबद्दल खंत व्यक्त करुन उद्योजकांना खडे बोल सुनावले आहेत. गरीब वर्गाला मध्यम वर्गात आणल्याशिवाय या देशाचा आणि आशिया खंडाचा विकास होवू शकत नाही. गरीब वर्गाला मध्यम वर्गात आणावयाचे असेल तर रोजगार वाढीवर भर देण्याचे काम उद्योजकांना करावे लागेल. आर्थिक स्तर बदलला की माणसाची खरेदी शक्तीही वाढते. गरीब वर्गातून मध्यम वर्गात आलेला माणूस बाजार पेठेतील वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करु लागला तर उद्योजकांनी उत्पादित केलेल्या वस्तुला मागणी वाढते. मात्र याकडे सोयीस्कररीत्या दूर्लक्ष होवू लागले आहे. उद्योजकांनी देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीपासून तर सफाई पर्यंतच्या उद्योगांचे संचलन केले पाहिजे. यातूनच उद्योजकांच्या वेगवेगळ्या फळ्या निर्माण होवून प्रत्येक वस्तू देशातच उत्पादित होण्याच्या प्रक्रियेला प्रेरणा मिळेल. आणि मोठ्या प्रमाणात निर्माण केलेल्या वस्तू बाजारपेठेचे शोध घेत जगभरात निर्यात होतील. या सुटसुटीत समीकरणाला मांडून भल्या-भल्या उद्योजकांच्या बुध्दीची कीव केली आहे. यावरुन उद्योग व्यवस्थेसाठी शासनाने दिलेल्या सोयीसुविधा योग्य नसुन उत्पादकांनीच कल्पकतेने उद्योग व्यवस्था राबवून रोजगार निर्मितीत वाढ केली पाहिजे आणि केवळ उत्पादन करणे हे उद्दिष्ट न ठेवता गुणवत्तापूर्ण उत्पादन ठेवून जगाला ‘मेड इन इंडिया‘चे ग्राहक बनविले पाहिजे. सगळ्या जगाचे लक्ष आशियाखंडाकडे असुन आशिया खंडात उद्योग व्यवस्थेत जो देश पुढे असेल तो जगातल्या सर्व गुंतवणूकदारांचे आकर्षण ठरेल.