Breaking News

माजी लष्करप्रमुख दलबीर सिंग सुहाग भाजपच्या वाटेवर ?

गुरूग्राम - जनरल व्ही.के.सिंह यांच्यानंतर माजी लष्करप्रमुख दलबीर सिंग सुहाग भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी गुरू ग्राम येथील सिंग यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी म्हणून भाजपने हाती घेतलेल्या ’समर्थनासाठी संपर्क’ या देशव्यापी अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. सुहाग यांच्यामुळे भाजपला माजी सैनिकांची तसेच निवृत्त अधिकारांची व्होट बँकेवर पकड मिळविता येणे शक्य होणार आहे. सुहाग चौधरी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे भिवानी लोकसभेच्या जागेसाठी सुहाग यांच्या पत्नीला भाजप उमेदवारी देण्याची शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी माजी लष्क रप्रमुख व्ही.के.सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी सिंह यांनी स्थिर आणि राष्ट्रवादी सरकार स्थापनेसाठी सैनिकांनी भाजपला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या भाजपने सिंह यांना परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा कार्यभार सोपविला होता.