Breaking News

दखल - पटेल असं तरी कारण द्या


निवडणूक निपक्ष वातावरणात आणि कोणताही अडथळा न येता पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते; परंतु आता ही जबाबदारी पार पाडण्यात निवडणूक आयोगाला अपयश येत आहे. सत्ताधारी पक्षाला पूरक भूमिका घेण्याचं काम निवडणूक आयोग करीत असल्याचा आरोप करण्याची संधी या आयोगाच्या अधिकार्‍यांनीच विरोधक ांना दिली आहे. ईव्हीएम मशीन बंद पडतात. त्यातही काही आक्षेप घेण्याचं कारण नाही; परंतु अशी ईव्हीएम मशीन किती असावीत, याला नक्कीच अर्थ आहे. मतदानापूर्वी ईव्हीएमची चाचणी घेतली जात असते. भारतीय हवामानाचा विचार करून अशी मशीन बनविलेली असतात. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा तीनही ऋतूचा मशीनवर प रिणाम व्हायला नको; परंतु आता जे चित्र पुढं आलं आहे ते चिंताजनक आहे. त्यातही निवडणूक आयोगानं उन्हाचं कारण दाखवून मशीन बंद पडत असल्याचं जे कारण दिलं आहे, ते नक्कीच पटण्यासारखं नाही. विरोधकांच्या हाती आयतं कोलित देण्याचा प्रकार निवडणूक आयोगानं केला आहे. यापूर्वीही दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या आमदारांना लाभाच्या पदावरून अपात्र ठरविण्याची कारवाई करताना त्यांचं साधं म्हणणं ऐकून घ्यावं, असं निवडणूक आयोगाला वाटलं नव्हतं. त्यामुळं जेव्हा हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं, तेव्हा निवडणूक आयोगाला ताशेरे ऐकावे लागले होते. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असून तिनं कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली काम करता कामा नये; परंतु निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांचं सध्याचं सारंच वागणं संशयास्पद वाटायला लागलं आहे. कर्नाटकच्या निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाच्या अगोदर भाजपच्या प्रवक्त्यांना कळतात, हे सारंच अनाकलनीय आहे.
उत्तर प्रदेशमधील कैराना लोकसभा आणि नुरपुर विधानसभेच्या जागेसाठी सोमवारी मतदान पार पडलं. मतदानादरम्यान काही ईव्हीएम मशिन्स खराब झाल्याच्या घटना घडल्या. या मुद्द्यावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी निशाणा साधला आहे. कडक उन्हामुळं ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचं अधिकारी सांगतलं. अधिकार्‍यांच्या या वक्तव्याचा अखिलेश यांनी समाचार घेतला. आज उन्हामुळं ईव्हीएम काम करत नसल्याचं सांगितलं जात आहे. उद्या पावसामुळं आणि थंडीमुळं ईव्हीएम काम करीत नाहीत, असं म्हणतील. काही लोक जनतेला रांगेत उभं करून आपल्या सत्तेची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. मुळात गोंदिया-भंडारा, पालघर, कैराना मतदारसंघातून ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या तक्रारी आल्या, त्या सकाळी साडेनऊच्या आसपासच्या होत्या. लोक सकाळी मतदान केंद्रावर आले होते. उन्हाचा परिणाम व्हायचा असता, तर दुपारी बारा ते सायंकाळी चार दरम्यानच्या उन्हामुळं व्हायला हवा होता. प्रत्यक्षात तसं झालेलं नाही. उन्हाचा ईव्हीएम मशीनवर परिणाम होत असेल, तर मग उन्हाऴ्यात निवडणूक घ्यायला नकोत. लोकसभेच्या निवडणुका तर मार्च ते मे या ऐन जादा उन्हाच्या काळात होत असतात. अशा वेळी निवडणूक आयोगाकडं काय पर्यायी यंत्रणा आहे? एरव्ही निवडणूक आयोग आपल्याकडं पुरेशा पर्यायी ईव्हीएम मशीन आहेत, असं सांगत असतं. आता मग या पर्यायी मशीन कुठं गेल्या, हा प्रश्‍न उरतोच. अती उन्हामुळं ईव्हीएममध्ये बिघाड होत आहे. पण कुठंही ईव्हीएममुळं निवडणूकीवर परिणाम होणार नाही. आमच्याकडे योग्य प्रमाणात अतिरिक्त यंत्रं आहेत. यंत्रात बिघाड ही तांत्रिक अडचण आहे. कडक उन्हामुळे व्हीव्हीपॅट खराब होत आहेत, असं मुख्य निवडणूक आयुक्त एल वेंकटेश्‍वर लू यांनी सोमवारी म्हटलं होतं. लोकांना मतदान न करताच परत जावं लागल्यामुळं मतदानाचं प्रमर्ची कमी झालं, हे तरी आता निवडणूक आयोगानं मान्य करायला हवं. हजारो ईव्हीएम मशीन खराब होच आहेत. शेतकरी, मजदूर, महिला आणि तरूण कडक उन्हात रांगेत उभे आहेत. हा तांत्रिक बिघाड आहे, की निवडणूक आयोगाचं अपयश? की लोकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न? अशामुळं लोकशाहीचा पाया कमकूवत होईल, असं ट्विट अखिलेश यादव यांनी केलं आहे. 
महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेशातील लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सोमवारी अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिन बंद पडल्याचे समोर आल्यानंतर विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. मशिन बिघडल्याने मतदारांचा गोंधळ उडाला. पालघर, गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीवेळी जाणीवपूर्वक मशीन बंद पाडल्याचा आरोप काँग्रेससह विरोधकांनी केला आहे. काही ठिकाणी तणाव निर्माण झाला. पालघर व भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत मतदानावेळी ईव्हीएम मशिनमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या बिघाडावर विरोधकांनी संशय व्यक्त केला असून, जाणीवपूर्वक मशीन बंद पाडण्यात आल्याचा आरोप केला. ज्या मतदान केंद्रांमध्ये ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाला. तिथं फेरमतदान घेण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली असून, व्हीव्हीपॅट स्लिपचीही मोजणी करावी, असं त्यांनी म्हटलं आहे. भा रिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भंडारा-गोंदियात जाणीवपूर्वक मशिन बंद पाडल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगानं मात्र तांत्रिक बिघाडामुळे मशिन बंद पडले तरी ते तातडीनं बदलण्यात आल्यानं मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडल्याचं स्पष्ट केलं. भंडारा-गोंदिया मतदार संघात तर शंभरहून अधिक ठिकाणी मशिन बंद पडण्याचे प्रकार घडले. पालघरमध्येही असेच प्रकार घडल्यानं मतदानात अडथळा निर्माण झाला होता. या मुद्द्यावर काँग्रेसनं फेरमतदानाची मागणी केली आहे. 2014 च्या लोक सभा निवडणुकाही कडक उन्हाळ्यात मे महिन्यामध्येच पार पडल्या होत्या. तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान यंत्रामध्ये बिघाड झाला नव्हता. या मशिन गुजरातमधून आणल्याची माहिती मिळते आहे, त्यामुळं संशयात अधिक भर पडत आहे, असंचव्हाण यांनी म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. निवडणूक प्रक्रिया नि:पक्षपणे पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. मात्र, दुर्दैवानं तसे होताना दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. ईव्हीएम मशिन तसेच व्हीव्हीपीएटी खराब असल्याच्या अनेक तक्रारी आल्या असल्याचं कैराना मतदार संघातील राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवार तबस्सूम हसन यांनी निवडणूक आयोगाला लेखी कळविलं आहे. मतदारांचा अधिकार डावलला जात असून, त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यास कोणीही समोर येत नसल्याचा आरोपही हसन यांनी निवडणूक आयोगाला पाठविलेल्या पत्रात के ला आहे. खराब असलेल्या बहुतांश ठिकाणच्या मशिन्स बदलण्यात आल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत झाल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. निवडणूक प्र क्रियेच्या विश्‍वासार्हतेवर कुणी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्याचं कारण नाही. ईव्हीएम मशिन्समध्ये मोठ्या प्रमाणावर दोष असल्याचा दावा केला जात असला, तरी त्यात तथ्य नाही, असं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं असलं, तरी शंका घ्यायला जागा आहे. पालघर मतदार संघात सुमारे चारशे, तर भंडारा-गोंदिया मतदार संघात पाचशे ठिकाणी ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाला. नालासोपारा, वसई, विरार यासारख्या ठिकाणी जिथं मतदान जास्त होण्याची शक्यता असताना तिथं मशिन बंद पडलं. तिथं मतदान होऊ नये, असे प्रयत्न करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद वापरण्याचं भाकीत केलं होतं. मतदान सुट्टीच्या दिवसाऐवजी सोमवारी घेण्यात आल्यानं मतदानाची टक्केवारी घटली. ईव्हीएम मशिन बंद पडल्यानंही मतदानावर परिणाम झाल्याचे बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आ. हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं.