Breaking News

ऑनलाईनचा शिष्टाचार - शेतकर्‍यांच्या योजनेत मोठा भ्रष्टाचार


हरीभाऊ सोनवणे नाशिक  - ऊन वारा डोक्यावर पावसाच्या धारा अशा एक ना अनेक अस्मानी अणि सुलतानी संकटाचा सामना करीत अहोरात्र काबाडकष्ट करणार्‍या शेतकर्‍यांसाठी असलेल्या तुटपुंज्या योजनेतही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे गलेलठ्ठ पगार घेऊन एसीची हवा खात काही कृषी अधिकारी ऑनलाईन लॉटरीत हा भ्रष्टाचार करीत आहेत. ही मोठी शोकांतिका जगाचा पोशिंदा शेतकरी राजा मांडू शकत नाही हे ही तितकेच सत्य आहे. महात्मा गांधी यांनी शेती व शेतकरी यांचे महत्व जाणलं होते. म्हणून बापूजींनी खेड्याकडे चला असा नारा दिला होता. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी राजाला काबाडकष्ट करतांना हातभार लागावा म्हणून काही योजना सुरू करण्यात आल्या. मात्र या सरकारने या योजनेत ऑनलाईन लॉटरी आणून अधिकार्‍यांना कुरणच निर्माण करून दिलय असे म्हटले तर वावगे ठरू नये. कांदा चाळ अनुदान योजना, ट्रॅक्टर ठिबक सिंचन, अवजारे अशा अनेक योजना आहेत,ज्या गरजवंत शेतकर्‍यांसाठी आवश्यक आहेत, त्यांना योजनेचा लाभ मिळायलाच हवा. प्रत्यक्षात याचा लाभ एसीची हवा घेत गलेलठ्ठ पगार घेणार्‍या अधिकारांच्या बगल बच्यांना, ज्यांना गरज नाही अशांना काही मोबदल्यात खिरापती सारख्या वाटल्या. पगारापेक्षा या खिरापती मधून अर्थार्जन बर्यापैकी होत असल्याने या मुजोर अधिकार्‍यांना शेतीच्या बांधावरील कष्ट काय कळणार? हे कमी झाले की काय म्हणून बीजेपी सरकारने या योजनेत ऑनलाईन लॉटरी पद्धतीने शेतकर्‍याला त्रास देण्याचा कट रचला. या ऑनलाईनच्या नादात अनेक तास कामधंदा बुडून वेळ घालूनही योजनेचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी दाम दिल्याशिवाय लॉटरीत नंबर येत नसल्याने वेळ व पैसा का घालवला या प्रश्‍नाचे उत्तर डोक खाजून मिळेनासे झाले आहे. कृषी विभागातील भ्रष्टाचार व्याप्ती मोठी असून यात थेट मंत्रालय पातळी पर्यंत लागेबांधे असल्यामुळे पुढे याचा समाचार घेऊ.
शेतकर्‍यांच्या योजनांसाठी शेतकर्‍यांना अधिकार्‍याचे कार्यालयीन उंबरे झिजवण्याची गरज नसून कार्यालयात एसीची हवा खात बसलेले अधिकारी शेतकर्‍यांच्या बांधावर जातील तो दिवस बापूजी यांनी पाहिलेल्या स्वप्ननांची पुर्ती करणारा ठरून गरजवंत शेतकर्यांला खर्‍या अर्थाने मदत मिळेल यात शंका नाही.