Breaking News

बेळगावमार्गे सुरू होणार हमसफर ट्रेन


बेळगाव : केंद्र सरकारने गेल्या साडेतीन वर्षांत कर्नाटकसाठी भरीव निधी दिला आहे. तसेच राज्यातील रेल्वेसेवेच्या सुधारणेबाबत अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे. याअंतर्गत 19 फेब्रुवारी रोजी म्हैसूर-बंगळूर रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगावमार्गे जाणार्या हमसफर रेल्वेचीही घोषणा करणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे आणि कोळसा खाणमंत्री पीयूष गोयल यांनी दिली.