Breaking News

पेपरफुटी प्रकरणी 15 जणांवर गुन्हा


सांगली ः दि. 4 -  जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक भरती परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी मुख्य सूत्रधार रामदास फुलारेसह 15 जणांविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आतापर्यंत सातजणांना अटक केली आहे. दोघींचा जामीन मंजूर आहे. तर इतरांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. संशयित संजय गणपती कांबळे (हरिपूर) याने शाहीन जमादार हिच्याकडून साडे सात लाख रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले. सूत्रधार फुलारेकडून 2 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. 
पेपरफुटीनंतर उपशिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आतापर्यंत शाहीन अजमुद्दीन जमादार (वय 25, करगणी, ता. आटपाडी), शाकीरा शौकत उमराणी (वय 35, कवलापूर, ता. मिरज), किरण वसंतराव कदम (जयसिंगपूर), संजय गणपती कांबळे (हरिपूर), मंदार मोहन कोरे (हरिपूर), रामदास आनंदा फुलारे (हुबालवाडी, ता. वाळवा), शशांक श्रीकांत जाधव (वय 25, पेठवडगाव, ता. हातकणंगले), सतीश शिवाजी मोरे (वय 36, कवलापूर), अशोक शामराव माने (वय 35, कामेरी, ता. वाळवा), शिवाजी पांडुरंग गायकवाड (वय 33, म्हाळुंगे, ता. करवीर), शीतल कल्लाप्पा मुगलखोडे (रा. भोसे, ता. मिरज), सचिन बाळासाहेब कुंभार (वय 32, हुतात्मा चौक, वाळवा), संताजी संपतराव पाटील (वय 35, पोखर्णी, ता. वाळवा), नीलम जालिंदर जाधव (रा. कामेरी) गणपती परसू सुतार (रा. सांगली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. 
आतापर्यंत फुलारेसह सातजणांना अटक केली आहे. तर दोघींचा जामीन मंजूर आहे. अन्य संशयितांचा तात्पुरता जामीन मंजूर आहे. पेपरफुटीचा तपास पोलिस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड हे करत आहेत. त्यांनी कसून तपास सुरू केला आहे. मुख्य सूत्रधार फुलारेकडून दोन लाख रुपये जप्त केले आहेत. तर संजय कांबळे याने कॉपी करताना पकडलेल्या शाहीनकडून साडे सात लाख रुपये उत्तरपत्रिकेसाठी घेतल्याचेही स्पष्ट झाले आहे. कांबळे याने अटकेच्या भीतीने अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. त्याच्या अर्जावर 5 रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.