Breaking News

श्री रेणुकामाता पायी दिंडीचे स्वागत


नगर 
भिंगार भाजप मंडल व तिरंगा प्रतिष्ठानच्यावतीने श्री क्षेत्र मानोरी श्री रेणुकामाता पायी दिंडी सोहळ्याचे स्वागत करून दिंडीतील वारकर्‍यांना व भक्तांना गवळीवाडा परिसरात अल्पोपहार देण्यात आला. गवळीवाडा परिसर हरिनामाने दुमदुमून गेला होता. 

भिंगार भाजप मंडल व तिरंगा प्रतिष्ठानच्या वतीने श्री क्षेत्र मानोरी श्री रेणुकामाता पायी दिंडी सोहळ्याचे स्वागत करून दिंडीप्रमुख हभप लक्ष्मणमहाराज चौघुले यांच्याकडे ड्रायफ्रुटस्, औषधोपचार कीट देऊन वारकर्‍यांना अल्पोपहार देण्यात आला. यावेळी मंडलचे शहराध्यक्ष शिवाजी दहिहंडे, कैलास गव्हाणे, विठ्ठल दळवी, शंकरराव बहिरट, सदाशिव नागपुरे, शीतल दहिहंडे, गणेश साठे, तुषार दहिहंडे, बाळासाहेब ठोंबरे, दिनेश शेरकर, संतोष हजारे, मनोज मोरे, जय रासकर, बाळासाहेब लकारे, प्रमोद जाधव, सदाशिव नागपुरे, संजय सुतार, हनुमंत चवंडके, मुंगी मॅडम, सुनीता दहिहंडे आदी उपस्थित होते.