Breaking News

कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकार्‍यांची निवड


कोपरगाव / ता. प्रतिनिधी 
तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहर पदाधिकार्‍यांची निवड नुकतीच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध प्रभागातील निवडी पार पडल्या. यावेळी निवड झालेल्या महिला पदाधिकार्‍यांना पुष्पा काळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
राष्ट्रवादी महिला शहर उपाध्यक्षा मायादेवी खरे, कविता साळुंके, अर्चना दुशिंग, आशा तुपे, राष्ट्रवादी महिला शहर सचिव भारती शिंपी, सारिका मेरास्कर, मीरा गंगुले, भाग्यश्री बोरुडे, राष्ट्रवादी महिला शहर संघटक- शीतल विखे, चंद्रभागा हिंगे, कल्पना मेढे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकारी पुढीलप्रमाणे राष्ट्रवादी युवती काँग्रेस उपाध्यक्षा अश्‍विनी आढाव, अश्‍विनी शिंदे, शीतल लोंढे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस सचिव- सायली नेहरे, प्रगती वढणे, परिणीती लकारे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस संघटक- रत्नमाला पंडोरे, उज्वला पंडोरे, सोनाली गंगुले, संगीता संजय बिच्छय्या आदी महिला पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. यावेळी सर्व नवनिर्वाचित महिला पदाधिकार्‍यांचे पुष्पा काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन, महिला शहराध्यक्षा नगरसेविका प्रतिभा शिलेदार, वर्षा गंगुले, माधवी वाकचौरे, सविता ढोक, रुपाली भोकरे, संगीता वर्पे, सरला कोठारी आदी उपस्थित होत्या. सर्व नवनिर्वाचित महिला पदाधिकार्‍यांचे माजी आ. अशोक काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले असून, भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.