Breaking News

श्रीरामपूर येथे स्वामी विवेकानंदांना अभिवादन


श्रीरामपूर ( प्रतिनिधी )
संपूर्ण जगाला त्यांच्या शब्दांवरून, भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली आणि आपल्या विचारांनी राष्ट्राच्या निर्माणासाठी सहभागी होण्याची युवकांना प्रेरणा देणारे स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीदिनानिमित्त मी त्रिवार अभिवादन करते असे नगराध्यक्षा अनुराधा आदिक म्हणाल्या.
नगरपरिषदेच्यावतीने लोकमान्य टिळक वाचनालयात स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन आदिक यांनी केले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नगरसेवक संतोष कांबळे, रवि पाटील , राजेंद्र पवार, पंडितराव बोंबले, सुमित मुथ्था, अ‍ॅड. तुषार आदिक, सुधा आढांगळे, प्रा.सुरेश वाबळे, संगीता दरेकर, गुरुचरण भटियाणी, ग्रंथपाल स्वाती पुरे , उपमुख्याधिकारी चंद्रकात सोनवणे आदी उपस्थित होते. नगराध्यक्षा आदिक पुढे म्हणाल्या की स्वामीजींच्या मते शिक्षणाचा मुलभूत हेतू हा माणूस घडविणे हाच आहे. अद्वैत तत्वाप्रमाणे मन, शरीर आणि आत्मा यांचा सुसंवादी विकास म्हणजे मनुष्याच माणूस म्हणून घडण होय. त्यांच्या मते ‘माणसात असलेल्या परीपूर्णतेचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण. यावेळी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.